Health Tips : तुमच्या जिभेचा रंग काळा तर झाला नाही ना? जिभेचा रंग उघड करतो तुमच्या आरोग्याची गुपितं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:19 PM2022-01-24T14:19:31+5:302022-01-24T14:20:35+5:30

Health Tips : आधीच्या काळात वैद्य, हकीम आणि अनेक डॉक्टर केवळ जीभ आणि डोळे बघूनच आजारांची माहिती मिळवत होते. जिभेचा रंग बदलण्यामागे अनेक कारणं असू शकतात.

Health Tips : What do different tongue colors mean? | Health Tips : तुमच्या जिभेचा रंग काळा तर झाला नाही ना? जिभेचा रंग उघड करतो तुमच्या आरोग्याची गुपितं

Health Tips : तुमच्या जिभेचा रंग काळा तर झाला नाही ना? जिभेचा रंग उघड करतो तुमच्या आरोग्याची गुपितं

googlenewsNext

आरोग्य (Health) चांगलं ठेवण्यासाठी केवळ चांगलं खाणं आणि व्यायाम करणं पुरेसं नसतं. चांगल्या आरोग्यासाठी जिभेचीही तेवढीच काळजी घ्यावी लागते. अनेकदा काही लोकांची जीभ काळी होते, पण ते याकडे गंभीरतेने बघत नाहीत. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. जिभेचा रंग तुमच्या आरोग्याची स्थिती सांगतो (Tongue Color) आणि जर तुमच्या जिभेचा रंग बदलला असेल तर तो अनेक आजारांकडे इशारा करतो. 

आधीच्या काळात वैद्य, हकीम आणि अनेक डॉक्टर केवळ जीभ आणि डोळे बघूनच आजारांची माहिती मिळवत होते. जिभेचा रंग बदलण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेकदा औषधं किंवा काही खाल्ल्यानेही जिभेचा रंग काही वेळासाठी बदलतो. पण जर तुमच्या जिभेचा रंग जास्त वेळासाठी बदलत असेल हे ध्यानात घ्या की काहीतरी गडबड आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिभेचा रंग बदलणे आणि त्यासंबंधी आजारांबाबत.

कसा असावा जिभेचा रंग?

medicalnewstoday.com नुसार, सामान्यपणे जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. यावर लाइट व्हाइट कोटिंग असणं पूर्णपणे सामान्य मानलं जातं. सामान्य जिभेचं टेक्सचर थोडं धुसर असतं. जर तुम्ही जीभ अशी असेल तर काळजी करण्याची गरज नाही. 

जीभ काळी असणं कॅन्सरचं लक्षण

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जिभेचा रंग काळा होणं कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो. त्यासोबतच असं मानलं जातं की, अल्सर किंवा फंगल इन्फेक्शन झाल्यावरही जिभेचा रंग काळा पडतो. अनेकदा चेनस्मोकर्सच्या जिभेचा रंगही काळा होऊ लागतो.

जीभ पांढरी होण्याचं कारण

तसेच जर तुमच्या जिभेचा रंग पांढरा झाला असेल तर याचा अर्थ हा आहे की, तुमच्या तोंडाचं आरोग्य खराब आहे आणि शरीरात डिहायड्रेटेडची समस्या आहे. जर जिभेवर कोटिंग कॉटेज चीजसारखा थर दिसत असेल स्मोकिंगमुळे तुम्हाला लिकोप्लेकियाही होऊ शकतो. अनेकदा फ्लूमुळेही जिभेचा रंग पांढरा होतो. 

जिभेचा रंग पिवळा होण्याचं कारण

अनेकदा जिभेचा रंग पिवळाही होतो. याचं कारण शरीरात पौष्टिक तत्व कमी असणं हे असतं. त्यासोबतच डायजेस्टिव सिस्टीममध्ये गडबड असणं, लिव्हर किंवा पोटाची समस्या असल्यावरही जिभेचा रंग पिवळा होऊ लागतो. याच स्थितीत जिभेवर पिवळी कोटींग जमा होऊ लागते.

जास्त कॅफीनमुळे होते जीभ ब्राउन

अनेकदा काही लोकांच्या जिभेचा रंग ब्राउन होऊ लागतो. जे लोक कॅफीनचं जास्त सेवन करतात, त्यांची जीभ ब्राउन कलरही होऊ शकते. अनेक स्मोकिंग करणाऱ्या लोकांच्या जिभेचा रंग ब्राउन होतो. स्मोकिंग करणाऱ्या लोकांची जिभेवर ब्राउन कलरचा एक थर जमा होतो.

जीभ लाल होण्याचं कारण

जर तुमची जीभ विचित्र प्रकारे लाल होऊ लागली असेल तर शरीरात फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता होऊ शकते. जिभेवर लाल स्पॉट दिसले तर याला जियोग्राफिक टंग म्हणतात. 

निळा किंवा पर्पल रंग

जिभेचा रंग निळा किंवा पर्पल झाल्यावर अनेक आजार होऊ शकतात. याचा अर्थ तुम्हाला हार्ट संबंधी समस्या असू शकतात. जेव्हा हार्ट ब्लड योग्यप्रकारे पंप करत नाही किंवा ब्लडमध्ये ऑक्सीजनची कमतरता होऊ लागते तेव्हा जिभेचा रंग निळा किंवा पर्पल होतो.
 

Web Title: Health Tips : What do different tongue colors mean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.