Fatty Liver: लिव्हरच्या आजाराच्या या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष, पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 11:19 AM2022-02-09T11:19:48+5:302022-02-09T11:21:11+5:30

Fatty Liver Symptoms: मेडिकल एक्सपर्टनुसार, आपल्या शरीरातील लिव्हर अन्न पचवण्यासाठी, विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि ऊर्जा साठवण्यासाठी काम करतं.

Health Tips : What is fatty liver and its symptoms, treatment | Fatty Liver: लिव्हरच्या आजाराच्या या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष, पडू शकतं महागात

Fatty Liver: लिव्हरच्या आजाराच्या या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष, पडू शकतं महागात

Next

Fatty Liver Symptoms: लिव्हर आपल्या शरीरातील असा अवयव आहे जो शरीर चालवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. जर कोणत्या कारणाने लिव्हर डॅमेज झालं तर व्यक्तीचा यात जीवही जाऊ शकतो. लिव्हर डॅमेज होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात किंवा लिव्हरमध्ये समस्या असेल तर शरीर वेळोवेळी काही संकेत देतं ज्यावरून तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता. अशात या संकेतांकडे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

मेडिकल एक्सपर्टनुसार, आपल्या शरीरातील लिव्हर अन्न पचवण्यासाठी, विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि ऊर्जा साठवण्यासाठी काम करतं. लिव्हरमध्ये काही प्रमाणात फॅट असतं. जे त्याला योग्यप्रकारे काम करण्यात मदत करतं. पण हे प्रमाण जर जास्त झालं तर लिव्हरसाठी धोकाही निर्माण होऊ शकतो.

लिव्हरमध्ये फॅट वाढणं योग्य नाही

रिपोर्टनुसार लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण वाढलं तर व्यक्ती फॅटी लिव्हर आजाराचा शिकार बनतो. हा आजार सामान्यपणे दोन प्रकारचा असतो. अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक. आपल्या लाइफस्टाईलमध्ये सुधारण करून नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगावर सहजपणे उपचार केले जाऊ शकतात. पण अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ठीक करण्यासाठी हॉस्पिटलमधील उपचार महत्वाचे ठरतात.

फॅटी लिव्हरच्या या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

डॉक्टरांनुसार, जेव्हा शरीरात फॅटी लिव्हरची समस्या सुरू होते तेव्हा शरीर काही संकेत देऊ लागतं. जर तुम्ही हे संकेत ओळखले आणि योग्य वेळी उपचार सुरू केले तर या आजारापासून वेळीच सुटका मिळवू शकता. पोटाच्या आजूबाजूला अतिरिक्त वजन वाढणे, लठ्ठपणा वाढणे, नॉन-अल्कोहोलिक लिव्हरचा परिवारात इतिहास असणे, शरीरात हाय लॅट लेव्हल असणे, हाय ब्लड प्रेशरची समस्या असणे आणि टाइप-२ डायबिटीससारख्या आजारात जर काही समस्या आढळून येत असेल तर समजून घ्यावं की, लिव्हरमध्ये  काहीतरी समस्या असू शकते. अशात वेळीच टेस्ट करावी.

लिव्हरला फॅटी होण्यापासून कसं वाचवाल?

डॉक्टरांनुसार, लिव्हर फॅटी होऊ द्यायचं नसेल तर लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागेल. सर्वातआधी तर मद्यसेवनापासून दूर रहावं लागेल. ड्रिंक केल्याने किडनी आणि लिव्हर दोन्हींना नुकसान पोहोचतं. फॅटी लिव्हरच्या समस्येपासून वाचण्यासाठी फायबरयुक्त पदार्थाचं सेवन करायला हवं. शरीराच्या वजनावर लक्ष द्या आणि रोज साधारण अर्धा तास कोणतं ना कोणतं शारीरिक मेहनत असलेलं काम नक्की करा. आहारात कडधान्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे.

(टिप - वरील लेखातील सल्ले आणि माहिती ही सामान्य माहितीवर आधाारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य ते उपचार घ्यावे.)

Web Title: Health Tips : What is fatty liver and its symptoms, treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.