बदाम खाण्याची योग्य वेळ, पद्धत आणि फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 05:50 PM2022-10-15T17:50:00+5:302022-10-15T18:47:44+5:30
जेव्हा नट्सचा विषय येतो तेव्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर सर्वातआधी बदाम आणि अक्रोड येतात. दोन्ही भारतीयांकडून वापरले जाणारे सर्वात आवडीचे नट्स आहेत.
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक काय काय करत असतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगला आहार आणि चांगल्या आहारासाठी गरजेचे आहेत चांगले फूड. डॉक्टर आणि आपल्या घरातील वयोवृद्ध लोक नेहमीच मुठभर ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला देत असतात. ज्यात बदाम, काजू, पिस्ता, अक्रोडचा समावेश असतो. या ड्रायफ्रूट्समधून शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
जेव्हा नट्सचा विषय येतो तेव्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर सर्वातआधी बदाम आणि अक्रोड येतात. दोन्ही भारतीयांकडून वापरले जाणारे सर्वात आवडीचे नट्स आहेत. बदाम लोकांची पहिली पसंत असतात आणि लोक बदाम नेहमीच खाऊ शकतात.
सर्वच नट्स आणि बीज विशेषकरून बदामात प्रोटीन, फॅट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. इतकेच नाही तर बदामात चांगल्या प्रकारचं फॅट असतं जसे की, ओमेगा ३, मोनो पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट जे आपल्या शरीरासाठी फारच चांगलं असतं. तुम्ही बदामाच्या फायद्यांबाबत तर अनेकदा ऐकले-वाचले असतील. पण बदाम आणि अक्रोड कधी खावे याबाबत फारचं ऐकलं नसेल. जेणेकरून जास्त फायदा होईल. कधी कधी बदाम किंवा अक्रोड योग्य वेळेवर खाल्लेत तर यांचा फायदा अधिक होतो.
कोणत्या स्थितीत कधी खावे
हृदय निरोगी ठेवण्यासाठी
जर तुम्ही हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदामाचं सेवन करत असाल तर तुम्ही दिवसाच्या वेळेत कधीही बदाम खाऊ शकता. पण फार जास्तही बदाम खाऊ नये. त्याला काहीतरी लिमिट असावी. नाही तर फायद्याऐवजी तोटेच अधिक होतील.
परफॉर्मन्स वाढवण्यासाठी
जर तुम्ही खेळाडू असाल आणि तुम्ही परफॉर्मन्स सुधारण्यासाठी बदामाचं सेवन करत असाल तर दरवेळी वर्कआउटनंतर मुठभर बदामाचं सेवन फायदेशीर ठरेल. जर तुम्ही सकाळी वर्कआउट करत असाल तर तुम्ही केवळ सकाळीच बदाम खावेत. जर सायंकाळी करत असाल तर तेव्हा बदाम खावेत.
वजन कमी करण्यासाठी
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी बदाम खात असाल तर तुम्हाला एका खास वेळेवर बदाम खाण्याची गरज नाही. तुम्ही कधीही बदाम किंवा अक्रोडचं सेवन करू शकता. जर तुम्हाला जेवण केल्यावर भूक लागत असेल तर बदाम आणि अक्रोड स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. याने पोट भरलेलं राहील.
झोपण्याआधी फायदेशीर
झोपण्यापूर्वी मुठभर बदाम खाल तर याने तुम्हाला अनेक फायदे होतील. बदामात मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे झोप आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. रात्री बदाम खाल तर मॅग्नेशिअममुळे ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. डायबिटीसचे रूग्ण असाल तर थोडे बदाम खाऊन झोपावे.
तसेच रात्री बदाम भिजवून ठेवून सकाळी खाल तर यानेही शरीराला आश्चर्यकारक फायदे होतात. बदामाच्या सालीमुळे अनेकजण बदाम पचवू शकत नाही. त्यामुळे अनोशा पोटी सालीसह बदाम खाऊ नये. तुम्ही एक ग्लास दुधात बदाम मिश्रित करूनही सेवन करू शकता. बदामाच्या सालीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे सालीसह बदाम खाणंही फायदेशीर आहे. फक्त अनोशा पोटी खाऊ नका.