Alert! प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं किडनीसाठी ठरू शकतं घातक, जाणून घ्या गंभीर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:20 PM2023-03-27T14:20:54+5:302023-03-27T14:21:22+5:30
भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
पाणी आपल्या शरीरासाठी फार गरजेचं असतं. आपल्या शरीराचा जवळपास 70 टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. पाण्यानेच आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. सोबतच शरीरातील सगळ्या अवयवांनी आपल्या क्रिया व्यवस्थित करण्यासाठी मदत करतं. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीराला अनेक नुकसानांचा सामना करावा लागतो ज्याला ओवरहायड्रेशन नावाने ओळखलं जातं.
जास्त पाणी पिणं नुकसानकारक
भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहेच. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. फार जास्त पाणी प्यायल्याने मेंदू आणि शरीराच्या कोशिकांमध्ये सूज येते. जेव्हा मेंदूच्या कोशिकांमध्ये सूज येते तेव्हा मेंदूवर प्रेशर पडतं. ज्यामुळे तुम्हाला कन्फ्यूजन, झोप येणे आणि डोकेदुखी अशा समस्या होतात. मेंदूवर जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हा याने हायपरटेंशन आणि लो हार्ट रेट अशा समस्या होतात.
फार जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात असलेल्या सोडिअमवर फार वाईट परिणाम होतो. सोडिअम आपल्या शरीरात असलेलं एक इलेक्ट्रोलाइट असतं जे कोशिकांच्या आत आणि बाहेर फ्लूइड बॅलन्स करतं. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात सोडिअमचं प्रमाण कमी होऊ लागतं, ज्यामुळे शरीरातील फ्लूइड कोशिकांच्या आत जातं. यानेमुळे कोशिकांमध्ये सूज येते आणि व्यक्ती कोमात जाते. हे त्याच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं.
किती पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर?
यासाठी ठोस अशी काही गाइडलाईन सेट करण्यात आलेली नाहीये की, एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती पाणी प्यावं. तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही किती फिजिकल अॅक्टिविटी करता. तुमचं शरीराचं वजन किती आहे. सोबतच या वातावरणाचीही महत्वाची भूमिका असते. डॉक्टरांनी सांगितलं की, सामान्यपणे नॉर्मल दिवसांमध्ये दिवसातून 3 लीटर आणि उन्हाळ्यात 3.5 लीटर पाणी पिणं सेफ असतं.
प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओवरहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि ओवरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटतं की, किडनी हेल्दी ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. पण असं नाहीये. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, जेव्हा तुम्ही फार जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन करता तेव्हा याने तुमच्या किडनीला अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हार्मोन रिअॅक्शन होतं. ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस आणि अधिक थकवा जाणवू शकतो. जर खूप सारं पाणी पिऊनही तुम्हाला लघवी येत नसेल तर हा याचा संकेत आहे की, तुमची किडनी क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहे.