चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:51 PM2024-04-29T12:51:01+5:302024-04-29T12:58:34+5:30
मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात.
मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील चवीनुसार मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, दरवर्षी 18 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू हा सोडियमच्या अतिसेवनामुळे होतो. मिठात सोडियम भरपूर असल्याने जास्त मीठ खाणे टाळावे. दिवसात ठराविक प्रमाणातच मीठ खावे.
सोडियममुळे मृत्यू कसा होतो?
शरीरात जास्त प्रमाणात सोडियममुळे ब्ल़ड प्रेशर हाय होऊ शकतं. त्यामुळे हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर, लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस, मेनिएर डिसीज आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत जास्त मीठ खाणं शक्यतो टाळावं.
दररोज किती मीठ खावं?
तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला स्नायूंमध्ये दीर्घकाळ अशक्तपणा जाणवत असेल तर ते शरीरात जास्त सोडियमचं लक्षण असू शकतं. याशिवाय वारंवार तहान लागणे, हलकी डोकेदुखी, वारंवार लघवी होणं, शरीरात सूज येणं ही शरीरात सोडियमची पातळी वाढण्याची लक्षणं आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, प्रौढांनी दररोज किमान 2,000 मिलीग्राम किंवा 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं. 2 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या उर्जेनुसार मीठ देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मीठ कमी खाण्यासाठी काय करावं?
1. फक्त ताजे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खा.
2. कमी-सोडियम उत्पादनं निवडा, ज्यात 120mg/100g पेक्षा कमी सोडियम असतं.
3. कमी मीठ घालून अन्न शिजवा.
4. अन्नाला चवीनुसार मीठाला पर्याय म्हणून औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करा.
5. पॅकेज केलेले सॉस, ड्रेसिंग आणि इन्स्टंट पदार्थ खाणं टाळा.