पुरूषांनी जास्त लोणचं का खाऊ नये? धोका वाढण्याआधी जाणून घ्या सत्य..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 01:52 PM2022-07-06T13:52:21+5:302022-07-06T13:52:34+5:30
Mens Health: लोक लोणच्याचं सेवन स्नॅक्स, लंच आणि डिनरसोबत करतात. एकप्रकारे बघायला गेलं तर लोणच्याने जेवणाची टेस्ट काही औरच येते.
Mens Health: आजकाल टेस्टसाठी लोक जेवणासोबत चटणी आणि लोणच्याचं सेवन करतात. या पदार्थांनी टेस्ट नक्कीच चांगली येते. जिभेचे चोचलेही पुरतात, पण लोणच्याचं जास्त सेवन करणं पुरूषांसाठी खूपच नुकसानकारक ठरू शकतं. ते कसं हे जाणून घेऊ.
लोक लोणच्याचं सेवन स्नॅक्स, लंच आणि डिनरसोबत करतात. एकप्रकारे बघायला गेलं तर लोणच्याने जेवणाची टेस्ट काही औरच येते. पण काही लोक याचं इतकं जास्त सेवन करतात की, ते भाजी ऐवजी लोणच्यासोबतच सगळं काही खातात. काही लोक लोणच्याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करतात. अशा लोकांनी सावध होण्याची गरज आहे.
ग्रस्ट्रिक कॅन्सर
वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, जास्त प्रमाणात लोणचं खाणाऱ्या लोकांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका वाढू शकतो. सोबतच यात मिठाचं प्रमाण जास्त असल्याने ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठीही हे फार धोकादायक ठरू शकतं. हायपरटेंशनच्या रूग्णांसाठी लोणच्याचं जास्त सेवन करणं फार जास्त नुकसानकारक ठरू शकतं.
बाजारात जे लोणचं मिळतं त्या लोणच्यांमध्ये जास्त प्रिझरव्हेटिव्ह असतात आणि सोबतच या लोणच्यामध्ये जास्त असटामिप्रिड असतात, जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. असटामिप्रिक एक कार्बन आहे, जे तुमच्या सेक्शुअल लाइफमध्ये अनेक समस्या निर्माण करू शकतं. त्यामुळे या लोणच्याचं सेवन कमी प्रमाणात तुम्ही करावं.
कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका
प्रयत्न हाच करा की, घरी तयार करण्याच्या आलेल्या लोणच्याचं कमी प्रमाणात सेवन करा. कारण तेव्हा लोणचं तयार केलं जातं तेव्हा त्यात भरपूर प्रमाणात तेल टाकलं जातं आणि सोबतच मसाल्यांचा वापर केला जातो. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या वाढू शकतात.