Health Tips : फिट आणि निरोगी राहण्यासाठी रोज रिकाम्या पोटी खा हे फळ, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 01:18 PM2022-08-26T13:18:31+5:302022-08-26T13:18:46+5:30

Health Tips : इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. त्यासाठी फार काही करण्याची गरजही तुम्हाला पडणार नाही. फक्त रोज सकाळी उपाशी पोटी एक सफरचंद खावे लागेल. 

Health Tips : Why you must eat one apple daily, you sholud know this | Health Tips : फिट आणि निरोगी राहण्यासाठी रोज रिकाम्या पोटी खा हे फळ, मग बघा कमाल!

Health Tips : फिट आणि निरोगी राहण्यासाठी रोज रिकाम्या पोटी खा हे फळ, मग बघा कमाल!

googlenewsNext

Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य चांगलं एकप्रकारे आव्हानच आहे. पण आरोग्य चांगलं ठेवणं तेवढं कठिणही नाहीये. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. त्यासाठी फार काही करण्याची गरजही तुम्हाला पडणार नाही. फक्त रोज सकाळी उपाशी पोटी एक सफरचंद खावे लागेल. 

- सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं त्यामुळे तुम्हाला ते खाल्लाने अनेक रोगांपासून आराम मिळेल. 

- सफरचंद खाण्याने शरीराचं इन्सुलिन लेव्हल कंट्रोलमध्ये राहतं. त्यासोबतच खाण्यात काही विषारी गेलं असेल तर या फळामुळे ते बाहेर पडतं. 
एका संशोधनात आढळले होते की, जे लोक आठवड्यातून किमान 5 सफरचंद खातात त्यांना अस्थमा होण्याची शक्यता कमी असते. त्यासोबतच सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराचं कोलेस्ट्रोल लेव्हलही कंट्रोल राहतं. 

- सफरचंद केवळ तुमचं हृदय मजबूत ठेवतं असं नाही तर तुमची तहानही भागवतं. तसेच तुम्हाला श्वासासंबंधी कोणताही त्रास होत नाही. 

- ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनीही सफरचंद खाल्ल्यास त्यांना आराम मिळू शकतो. 

- अनेक अभ्यासातून खुलासा झाला आहे की, ज्या लोकांना त्वचेसंबंधी काही विकार त्यांनी नियमीत सफरचंद खायला हवे. 

- सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत होते. एका सफरचंदमध्ये 50 ते 80 कॅलरी असतात. सोडियम किंना फॅट नसतात.   

- सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी आणि ए असतं. तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस आणि आयर्नही अधिक प्रमाणात असतं.

Web Title: Health Tips : Why you must eat one apple daily, you sholud know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.