रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, वेळीच माहीत करून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 07:51 PM2020-08-10T19:51:23+5:302020-08-10T19:56:07+5:30
आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार हळूहळू पाणी प्यायला हवं. पटपट घोट घेत पाणी प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.
शरीर चांगले आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं महत्वाचं असतं. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर वेगवेगळे आजार उद्भवतात. दिवसभरातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायालाच हवे. तुम्ही रोज पाणी पुरेश्या प्रमाणात पाणी पित असाल पण पाणी पित असताना काही चुका केल्यानं आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार हळूहळू पाणी प्यायला हवं. पटपट घोट घेत पाणी प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.
उभं राहून कधीही पाणी पिऊ नये उभं राहून पाणी जेव्हा तुम्ही पिता त्यावेळी पोटाच्या खालच्या भागात पाणी जाते. त्यामुळे शरीराला पुरेश्या प्रमाणात पाणी मिळत नाही. तुम्ही उभं राहून पाणी पित राहाला तर कालांतराने गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पाणी पिऊनही शरीर हायड्रेट राहत नाही. शक्य असल्यास बाटलीने पाणी पिणं टाळून ग्लासनं पाणी प्या. जर तुम्ही आजारी असाल तर जास्तीत जास्त पाणी प्या.
पाणी पिण्याची योग्य वेळ
सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.
योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत.
गरम पाणी पिण्याचे फायदे
1) सकाळी लवकर उठून गरम पाणी पिल्याने पचनक्रिया संतुलित राहते. जेवण लवकर आणि सहज पचतं.
2) सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीराचं वजन नियंत्रित राहतं. यामुळे शरीरातील तापमान वाढण्यासही मदत मिळते.
3) आजकाल वेळेच्याआधीच म्हातारपण येताना बघायला मिळतं. जर तुम्हालाही वयाच्या आधीच म्हातारप नको असेल तर सकाळी उठून रोज गरम पाणी नक्की प्यावे.
4) रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने कफ, वात आणि पित्तसारख्या समस्याही होत नाहीत.
5) गरम पाणी त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
हे पण वाचा :
२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या
अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान
लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा