फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:20 PM2020-07-20T13:20:40+5:302020-07-20T13:22:39+5:30
दूवर नकारात्मक परिणाम झाल्यास स्मृती, संवेदना यांवर नकारात्मक परिणाम होत असतो. ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
आपल्याला शारीरिक स्थितीसोबतच मानसिक स्थितीचीसुद्धा काळजी घ्यायला हवी. आपले शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले आहे. शारीरिक स्थितीचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो. मेंदू हा शरीरातील मह्त्वपूर्ण अवयव आहे. मेंदूवर नकारात्मक परिणाम झाल्यास स्मृती, संवेदना यांवर नकारात्मक परिणाम होत असतो. ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
नाष्ता न करणं
अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही नाष्ता करणं सोडून देता. नाष्ता हा दिवसभर उर्जा देण्यासाठी आणि शरीराला निरोगी ठेवण्याासाठी फायदेशीर असतो. नाष्ता न केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम घडून येतो. शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पौष्टिक आहार घेत नसाल तर आरोग्यावर परिणाम होतो. मेंदूत ८० टक्के भागात पाणी असते. एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी मेंदूला पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी जास्तीत जास्त प्यायाला हवं. जेणेकरून शरीर डिहायड्रेड होणार नाही.
साखरेचं अतिसेवन
जास्त प्रमाणात साखर खाल्याने वेगवेगळ्या शारीरीक समस्या उद्भवण्याची शक्यता असतो. फक्त लठ्ठपणा आणि मधुमेह नाही तर साखरयुक्त पदार्थ खाल्याने मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. कारण साखरेच्या जास्त सेवनाने रक्तात पोषक तत्वांची कमतरता जाणवते. जास्त साखरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास स्मरणशक्ती तसचं विचार करण्याची क्षमता कमी होते.
उशीरा झोपणं
उशीरा झोपल्यानं आपली स्लिप सायकल डिस्टर्ब होते. उशीरा झोपल्याने सतत आजारी पडण्याची स्थिती उद्भवते. त्यामुळे हदयासंबंधी आजारांचा धोका असू शकतो. याशिवाय मेंदूवरही वाईट परिणाम घडून येतो. एका रिसर्चनुसार निरोगी जीवन जगण्यासाठी जास्त झोपणं किंवा कमी झोपणं हा प्रकार घातक ठरू शकतो. त्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उशीरा उठल्याने शरीरासोबतच मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त झोपल्यानं लठ्ठपणा,डोकेदुखी, कमेरेचे दुखणं उद्भवू शकते.
मोबाईल जास्तवेळ वापरणं
अनेकांना टिव्ही मोबाईल बघत झोपण्याची सवय असते. कंम्प्यूटर किंवा मोबाईलचा वापर करतानाचा अनेकजण जेवतात. ही खूप वाईट सवय आहे. त्यामुळे ओव्हरइटींग किंवा डोळ्यांचं नुकसान होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या १ तास किंवा २ तास आधी मोबाईल स्वतःपासून लांब ठेवा.
भारतात कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाला सुरूवात; आता 'हे' ५ उपाय संक्रमणापासून वाचवणार