Health : वजन वाढविण्यासाठी ‘या’ हेल्दी पदार्थांचा करा वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2017 06:55 AM2017-07-14T06:55:36+5:302017-07-14T12:25:36+5:30
आपली शरीरयष्टीही दुबळी असेल आणि वजन वाढविण्याचा विचार करीत असाल तर 'या' पदार्थांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून असावा.
चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी सेलिब्रिटींना शरीरात योग्य बदल करावा लागतो. एकतर वजन वाढवावे लागते नाही तर वाढलेले वजन कमी करावे लागते. दंगल चित्रपटासाठी आमिर खानने अपेक्षित वजन वाढविले होते. तर सुलतान चित्रपटासाठीही सलमान खानने वजन वाढविले होते. वजन वाढविण्यासाठी सेलेब्स प्रथम स्नायुंच्या बळकटीसाठी योग्य व्यायाम करतात आणि दिवसांतून दोन वेळा भरपूर जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने ५-६ वेळा खात असतात. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्या आहारात विशेषत: खालील पदार्थांचा समावेश असतो. आपली शरीरयष्टीही दुबळी असेल आणि वजन वाढविण्याचा विचार करीत असाल तर 'या' पदार्थांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून असावा.
* दूध
दुधात प्रोटीन्स व कर्बाेदके तसेच इतर पोषणद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे दुधाच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते. १०० मिली दुधातून अंदाजे ३.४ ग्राम प्रोटिन्स मिळतात आणि रोज २ ग्लास दुध प्यायल्यास तुम्ही १४ ग्राम प्रोटिन्स सेवन करू शकता.
* केळ
वजन वाढवण्यासाठी केळ खाण्याचा सल्ला दिला जातो. एका केळ्यातून १०५ कॅलरीज मिळतात ज्या तुम्हाला तात्काळ उर्जा देतात. व्यायामानंतर शरीराची झीज भरून काढण्यास मदत होते. बऱ्याचदा टेनिसपटू ब्रेकमध्ये उर्जा मिळवण्यासाठी केळ खात असल्याचं तुम्ही पाहिलच असेल.
* अंडी
अंड्यांच्या सेवनाने देखील शरीराला उच्च प्रतीचे प्रोटिन्स मिळतात. १०० ग्राम अंड्याच्या सेवनाने अंदाजे १३ ग्राम प्रोटिन्स मिळतात. अंड्यातील ‘व्हिटामिन ए’ व ‘व्हिटामिन बी १२’ चा आहारात समावेश हितावह आहे.
* सुकामेवा
काजू, बदाम, अक्रोड, किसमिस यासरख्या तात्काळ कॅलरीज देणारा सुकामेवा आहारात ठेवा. फळांपेक्षा सुकामेवा खाणे हा वजन वाढवण्याचा एक हेल्दी उपाय आहे. फळांपेक्षा सुक्यामेव्यातून शरीराला अधिक कॅलरीज व पोषणद्रव्ये मिळतात.
* ओट्स
वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवणाऱ्यासाठी देखील ओट्स चा आहारात वापर असणे आवश्यक आहे. ओट्समधून शरीराला फायबरचा पुरवठा होतो. १०० ग्राम ओट्स मधून १७ ग्राम प्रोटिन्स मिळतात. ओट्स मधून शरीराला आयर्न (लोह) देखील मिळतात.
* बटाटा
जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुमच्या आहारात किमान ४० % घटकांपासून कर्बोदक असतील अशा पदार्थांचा समावेश करा. तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश वाढवा. बटाट्यातील ‘ग्यूटामिन’ व ‘अजीर्नीन’ यासारखी अमिनो अॅसिड वजन वाढविणाऱ्यासाठी हितावह आहे. बटाट्याचा वापर सालीसकट केला तर ते जास्त फायदेशीर राहील.
* सोयाबीन
वजन वाढवण्यासाठी लागणारी कर्बोदक पुरेशी मिळवण्यासाठी तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करू शकता. रोजच्या १०० ग्राम सोयाबीन सेवनाने तुम्हाला ३६ ग्राम प्रथिने मिळू शकतात. गव्हाच्या पिठात तुम्ही सोयाबीनचे पीठ एकत्र करून पोळ्या केल्यास आपोआप तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करून घेऊ शकता.
* मांसाहार ( चिकन )
शाकाहाराप्रमाणेच मांसाहार देखील घेणे फायदेशीर आहे. चिकन खाणे केवळ चविष्ट नसून १०० ग्राम सेवनातून २५ ग्राम प्रोटिन्स तुम्हाला मिळू शकतात . महिन्याभराच्या नियमित सेवनाचा तुम्हाला नक्कीच तात्काळ परिणाम दिसून येईल.
* नुडल्स
नुडल्स खाणं हे काहीसं धोकादायक समजलं जात, मात्र यामधून तुम्हाला कबोर्हायड्रेट व कॅलरीज मिळू शकतात. तसेच नुडल्समध्ये भाज्या टाकून खाल्याने तुम्हाला अनेक पोषणद्रव्ये याचबरोबरीने व्हिटामिन्स व अॅन्टीआॅक्सिडन्ट मिळतील.
* लोणी
जर तुम्हाला लोणी खायला आवडत असेल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही लोण्याचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करून घेऊ शकता. लोण्यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात मेद मिळू शकतात. १०० ग्राम लोण्यातून तुम्हाला ८१ ग्राम मेद मिळू शकेल.
Also read : Health : सोयाबीनमुळे मिळेल मनासारखी बॉडी, असा करा वापर !
: Health : जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !
source : thehealthsite