HEALTH : ​वजन कमी करण्यासाठी पाण्याचा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2017 09:18 AM2017-06-10T09:18:40+5:302017-06-10T14:48:40+5:30

जाणून घ्या, वजन कमी करण्यासाठी पाण्याचा वापर कसा करावा ते.

HEALTH: Use water to lose weight! | HEALTH : ​वजन कमी करण्यासाठी पाण्याचा असा करा वापर !

HEALTH : ​वजन कमी करण्यासाठी पाण्याचा असा करा वापर !

Next
ल्या शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. डॉक्टरांच्या सल्लयानुसार दिवसभरातून साधारणत: ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे. जर असे केले नाही तर शरीराला पाण्याची कमतरता भासते आणि थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, मुतखडा या प्रकारच्या समस्या होण्याची शक्यता वाढते. 
दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा योग्य वापर केल्यास वजनदेखील कमी होऊ शकते, असे एका संशोधानातून आढळले आहे. 
जाणून घ्या, वजन कमी करण्यासाठी पाण्याचा वापर कसा करावा ते. 
चहा किंवा कॉफी पिण्याच्या अगोदर अर्धा ग्लास पाणी प्या.
एकाच वेळी भरपूर पाणी पिण्यापेक्षा दिवसभरात थोड-थोड पाणी प्यावे.
झोपेतून उठल्यानंतर १-२ तासांनी नाश्ता करण्याच्या अगोदर आणि नाश्ता केल्यानंतर १ ग्लास पाणी पिण्याने भूक कमी होते.
झोपण्याच्या तासभर आधी २ ग्लास पाणी पिण्याने रात्री भूक लागत नाही.
जेवण करण्याच्या अगोदर २० मिनिट आधी १-२ ग्लास पाणी पिण्याने तुम्हाला लठ्ठपणा दूर ठेवता येईल.  
अवेळी भूक लागत असेल तर कोमट पाणी पिण्याणे अवेळी भूक लागणार नाही.

Also Read : ​HEALTH ALERT : ​सकाळच्या ‘या’ सहा वाईट सवयींमुळे वाढते वजन !
                  : ​वजन कमी करण्याच्या टिप्स

Web Title: HEALTH: Use water to lose weight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.