HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2017 11:35 AM2017-05-17T11:35:08+5:302017-06-13T13:29:56+5:30

आपणही या समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या ही माहिती !

HEALTH: Want to reduce belly fat? Make breakfast! | HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !

HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !

Next
टाची चरबी वाढणे ही समस्या दिवसेंदिवस बहुतांश लोकांना सतावू लागली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी अनेकजण व्यायाम करणे, जेवण कमी करणे आदी उपाय अवलंबतात, मात्र हाती पडते ती निराशा. यासाठी आज आम्ही आपणास पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक सोपा उपाय सांगत आहोत. हा उपाय म्हणजे दररोज सकाळचा नाश्ता काळजीपूर्वक करायला हवा. जाणून घेऊया नाश्त्यासाठी काय महत्त्वाचं?

* सकाळच्या नाश्त्यात ऊर्जेसाठी केळी खावी. केळी खाल्याने वजन वाढत नाही आणि एनर्जी वाढते.
* सकाळच्या वेळी  पोहे चांगले असतात. यामध्ये कॅलरीज कमी असतात. शिवाय पोटही भरते.
* अंड सगळ्यात उत्तम नाश्ता आहे. अंड्यामुळे ऊर्जा मिळते. तुम्ही उकडलेलं अंड किंवा आमलेट खाऊ शकता.
* न्याहारीमध्ये सोयाची जोड द्या. त्यात कॅलरीज कमी आणि प्रोटिन्स जास्त असतात. शरीरावर चरबी जमा होत नाही.
* रोज नाश्त्यामध्ये फळं असायला पाहिजेत. शक्यतो सिझनप्रमाणे फळ असावं
* दूध सगळ्यांनाच पचत नाही. पण ज्यांना पचतं त्यांनी ते प्यावं. त्यामुळे दिवसभराची एनर्जी शाबूत राहते.
* ग्रीन टी घेतल्यानं पचनक्रिया चांगली राहते.
* काकडी,टोमॅटो,कांदा,बिट याचं सँडविच बनवून खा
* आहारात ओट असणं कधीही चांगलं. त्यात फायबर्स असतात.
* पेस्ट्रीज,डोनट्स आणि केक आदी वस्तू खाऊ नका. त्यामुळे तुमच्या कॅलरीज वाढतात.

Also Read : Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !

Web Title: HEALTH: Want to reduce belly fat? Make breakfast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.