Health is Wealth; सलग दोन महिने जांभूळ खालल्याने काय होतो फायदा, जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:58 PM2021-05-19T12:58:07+5:302021-05-19T12:58:14+5:30
सोलापूर लोकमत विशेष...
जांभूळ हे पाचक यकृत उत्तेजक त्वचारोग , पांडुरोग ( अनिमिया ) कावीळ, रक्तदोषविकारक , मानसिक रोगी, हाडांचे दातांचे रोग या आजारांवर दोन महिने दररोज २५० ते ५०० ग्राॅम जांभूळ दिवस भरात खावे .जांभूळा मध्ये नैसर्गिक रित्या असलेल्या लोह तत्त्वामुळे लवकर गुण येते जांभळा मध्ये लोह , कॅल्शियम , फॉस्फरस , क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते मधुमेह , हृदयविकार , पोटाचे विकार , त्वचाविकारात , यावर लाभदायक आहे . साधारणपणे जून-जुलै महिन्यात जांभूळ मिळतात जांभूळ हे जंगली फळ आहे ते वर्षातून एकदाच येते म्हणून याला सिझनल फळ म्हणून पाहतात साधारणता दोन ते अडीच महिने जांभळाचा कालावधी असतो त्यावेळी भरपूर जांभूळ खावे त्यानंतर जांभळाच्या बियां , झाडाची साल , पाने किंवा बाजारात त्याचे तयार ज्युस व सिरप मिळते याचा वापर आपण करू शकतो जांभूळ खाल्यामुळे आपण निरोगी राहू शकतो
१) जांभळा मध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते त्यामुळे रक्तातील स्टार्च व साखरेचे रूपांतर ऊर्जा मध्ये होते
२)आपणास अति तहान लागणे किंवा सतत लघवी होणे यासारखे विकार दूर होतात .
३) जांभळाच्या झाडाच्या सालीची किंवा बियांची पावडर पोटाच्या विकारावर लाभदायक आहे .
४) जुलाब , डायरिया , अपचन यांसारख्या आजारात यांचा उपयोग लाभदायक ठरतो .
५) जांभूळ हे नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करते कारण त्याच्यात लोह म्हणजे आर्यन असते त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत मिळते
६) जांभळामध्ये ' अ ' , ' क ' जीवनसत्त्व त्याच बरोबर खनिज अधिक प्रमाणात असते त्यामुळे आपल्या डोळ्याचे व त्वचेचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत
मिळते .
७) जांभुळ हे थंड खुनाचे असल्यामुळे पोटातील भगभग व अपचन यावर गुणकारी आहे.
८) जांभुळात अस्ट्रोजेट असल्यामुळे आपली त्वचा चांगली राहते ज्यांची त्वचा तेलकट राहते त्यांना जांभूळ आधी फायदेशीर राहते .
९) जांभूळ खाल्ल्याने दात व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते .
१०) जांभळा मध्ये ' क ' जीवनसत्व असल्या मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते .
११) जांभळाच्या बियांची
पावडर करून गावरान देशी गाईच्या दुधात मिसळून त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावल्यास मुरूम व चेहऱ्यावरील पुटकुळ्या जाण्यासाठी मदत मिळते .
१२) जांभळाचे व्हिनेगर किंवा सिरप दिवसातून दोन तीन वेळा पाण्यासोबत घेतल्या भुक वाढते .
१३)जांभुळाचे रस आपल्या त्वचाविकारत त्वचेवर लावल्यास उपयोगी ठरते .
१४) जांभळाचा ज्युस आपल्या शरीरातील अशक्तपणा , अॅनिमिया , व स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते .
१५)जांभूळामध्ये पोट्याशियम अधिक प्रमाणात असल्यामुळे हृदय विकारापासून मुक्ती मिळते व आपले हृदय सशक्त होते आणि ते हायपर टेन्शन होत नाही .
जांभळाचे वरील उपचार आपण करून पहावे प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. कोणाची वात प्रकृती, कुणाची पित्तप्रकृती तर कोणाची कफ प्रकृती असते. कदाचित कुणाला याचा त्रास होत असेल तर हा प्रयोग करणे थांबवावा अन्यथा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये, तरीपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून प्रकृतीनुसार प्रत्येकालाच हा नियम लागू होईल असं सांगता येत नाही. धन्यवाद
- क्रांतीवीर महिंद्रकर
(योग निसर्गोपचार व संमोहनतज्ञ)