सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:09 PM2024-05-17T12:09:21+5:302024-05-17T12:18:37+5:30

Idiot Syndrome : इंटरनेटवर आपल्या आजाराचे निदान करण्याच्या सवयीमुळे लोक "इडियट सिंड्रोम" चे बळी होऊ शकतात. गेल्या काही काळापासून या अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सिंड्रोमबद्दल सर्व काही जाणून घेऊया...

health what is idiot syndrome and its side effects | सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी

सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी

आजकाल लोकांमध्ये इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. प्रत्येक लहान-मोठ्या माहितीसाठी लोक आधी इंटरनेटची मदत घेतात. एवढंच नाही तर लोक त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. सध्या तर अनेक जण इंटरनेटलाच आपला डॉक्टर मानतात आणि त्यांच्या तब्येतीत कोणताही बदल जाणवल्यास ते डॉक्टरांऐवजी इंटरनेटकडे वळतात.

अशा प्रकारची सवय आता तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. इंटरनेटवर आपल्या आजाराचे निदान करण्याच्या सवयीमुळे लोक "इडियट सिंड्रोम" चे बळी होऊ शकतात. गेल्या काही काळापासून या अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सिंड्रोमबद्दल सर्व काही जाणून घेऊया...

इडियट सिंड्रोम म्हणजे नेमकं काय?

IDIOT म्हणजे इंटरनेट डिराइव्ड इंफॉर्मेशन ऑब्सट्रक्शन ट्रीटमेंट. ही अशी स्थिती आहे जिथे सहज उपलब्ध होणारी माहिती योग्य वैद्यकीय उपचारांमध्ये अडथळा आणते इंटरनेट सर्चच्या आधारे रोगाचे स्वतःहून निदान केलं जातं, ज्यामुळे एकतर योग्य उपचार मिळत नाहीत किंवा स्वतःवर उपचार करून घातक परिणाम भोगावे लागतात.

मात्र याचा अर्थ असा नाही की इंटरनेट तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये उपयुक्त ठरू शकत नाही. चांगल्या आणि विश्वासार्ह वैद्यकीय वेबसाइट्स आणि ऑनलाइन सपोर्ट ग्रुप तुम्हाला महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती देऊ शकतं. जेव्हा तुम्ही इंटरनेटवर क्विक सर्चच्या रिझल्टला एक योग्य मेडिकल डायग्नोसिस मानता तेव्हा धोका असतो.

WHO काय म्हणते?

डब्ल्यूएचओ याला "इन्फोडेमिक" म्हणते. याने आरोग्य सेवेमध्ये एक कठीण परिस्थिती निर्माण केली आहे, कारण रोगाच्या प्रादुर्भावाच्या वेळी डिजिटल आणि फिजिकल वातावरणात खूप जास्त माहिती तयार केली आहे आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर अविश्वास निर्माण झाला आहे.

या सिंड्रोमचा लोकांवर कसा होतो परिणाम?

IDIOT सिंड्रोमचे मानसिक परिणाम गंभीर असतात. यामुळे अशी मानसिकता निर्माण होऊ शकते ज्यामध्ये रुग्ण औषध आणि डॉक्टरांवर अविश्वास ठेवू लागतात आणि स्वतःवर उपचार करणे निवडतात. ही विचारसरणी आणि सवय आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या उपचारात अडथळा आणू शकते, ज्यामुळे रुग्णाची स्थिती गंभीरपणे बिघडू शकते.

इडियट सिंड्रोमचे नकारात्मक प्रभाव

- जरी इंटरनेट हे आरोग्यविषयक माहितीचा खजिना असू शकते, तरीही तुम्ही तुमच्या लक्षणांबद्दल सतत माहिती शोधत असाल तर त्यामुळे चिंता आणि तणाव निर्माण होऊ शकतो.
- सायबरकॉन्ड्रिया किंवा आयडीओटी सिंड्रोम, तुम्हाला लक्षणांची चुकीची माहिती देईल. त्यामुळे तुम्हाला गंभीर आजार झालाय असं तुम्ही समजू लागाल पण प्रत्यक्षात तसं काही नाही. 
- तुम्हाला ऑनलाइन काय सापडेल या भीतीमुळे तुम्ही वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करू शकता किंवा टाळू शकता, जे लवकर निदान आणि उपचारांसाठी महत्त्वाचे असू शकते.
- सायबरकॉन्ड्रिया तुम्हाला ऑनलाइन माहितीवर आधारित औषधे थांबवण्यास किंवा बदलण्यास प्रवृत्त करू शकते, जे धोकादायक असू शकतं आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
 

Web Title: health what is idiot syndrome and its side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.