Health : फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणते वय योग्य ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2017 07:37 AM2017-07-04T07:37:10+5:302017-07-04T13:52:29+5:30

बरेच सेलेब्स खूप उशिराने फॅमिली प्लॅनिंग करताना दिसतात. मात्र फॅमिली प्लनिंग योग्य वेळी केली नाही तर बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

Health: Which age appropriate for family planning? | Health : फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणते वय योग्य ?

Health : फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणते वय योग्य ?

Next

लग्नानंतर काही दिवसांनी कपल लगेच फॅमिली प्लॅनिंगचा विचार करु लागते. मात्र फॅमिली प्लॅनिंग करताना योग्य वेळ आणि योग्य वय माहित असणे तेवढेच आवश्यक आहे. बऱ्याचदा योग्य जीवनसाथी किंवा करियर निवडण्याच्या प्रयत्नात वयाची ३० ते ३२ वर्ष पूर्ण होतात. सेलिब्रिटींचा विचार केला तर बरेच सेलेब्स खूप उशिराने फॅमिली प्लॅनिंग करताना दिसतात. मात्र फॅमिली प्लनिंग योग्य वेळी केली नाही तर बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

Related image

संशोधनात साधारण २५ ते २७ हा काळ फॅमिली प्लॅनिंगसाठी योग्य काळ मानला गेला आहे. जरी ३० ते ३२ वय झाले तरी चिंता करू नये. मात्र एक वेळ जर तुम्ही आई बनला असाल तर, दुसऱ्या बाळाच्या वेळी दोन मुलांमध्ये फार अंतर ठेऊ नका. असे करणे बाळ आणि आईसाठी काहीसे धोकादायक असते. म्हणूनच अशा वेळी चान्स घेताना काही काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. 

आपले वय ३० वर्ष पूर्ण झाले असेल किंवा त्याच्या आसपास असाल आणि तुम्ही फॅमिली वाढविण्याचा करीत असाल तर काही हरकत नाही. या वयातही गरोदर राहणे फारसे अवघड नसते. ३२ व्या वर्षीही तुम्ही आरामात आई-वडील बनू शकता. पण, तुम्ही जर ३५ शी नंतर हा विचार करत असाल तर, काही प्रमाणात धोकादायक असल्याचे संशोधनात म्हटले आहे. कारण या वयात शरीरात विशेष बदल झालेले असतात. त्यामुळे हे बदल गर्भधारणा आणि बाळंतपणासाठी अनुकूल असतातच असे नाही. त्यामुळे तुम्ही चान्स घेत असाल तर, काहीसे रिस्की ठरू शकते. शिवाय वयाच्या ३५ नंतर जुळी बाळे जन्माला येण्याचाही संभव असतो. तरीही या वयात जर तुम्ही आई-बाबा होण्याचा विचार करता आहात तर, तुम्हाला तुमची जीवनशैली बदलणे गरजेचे ठरते. 
  
Image result for family-planning

जर तुम्ही ४० व्या वर्षी आई-वडील होण्याचे स्वप्न पाहात असाल तर, या वया गर्भवती राहण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. या काळात गर्भवती महिलांना उच्चरक्तदाबाचा त्रास होण्याचा संभव असतो. जो होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच योग्य वेळी निर्णय घ्या आणि तुम्हाला कोणत्या वयात आई-बाबा व्हायचे आहे याचा निट विचार करा.  

Source : india.com

Web Title: Health: Which age appropriate for family planning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.