रात्रभर झोपूनही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? तर तुम्हाला आहे 'ही' गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:49 PM2024-06-19T13:49:18+5:302024-06-19T13:57:02+5:30

सततचा आळस येणं ही चांगली गोष्ट नाही. अधूनमधून असं घडत असेल तर ठीक आहे, पण हे सर्व वेळच होऊ लागलं तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे.

health why do i never feel like getting up in the morning know about details | रात्रभर झोपूनही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? तर तुम्हाला आहे 'ही' गंभीर समस्या

रात्रभर झोपूनही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? तर तुम्हाला आहे 'ही' गंभीर समस्या

दिवसभर फक्त पडून राहावं असं वाटत असेल, कोणतंही काम करावसं वाटत नाही... अधूनमधून असं घडत असेल तर ठीक आहे, पण हे सर्व वेळच होऊ लागलं तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. सततचा आळस येणं ही चांगली गोष्ट नाही. आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. जर तुम्ही खूप जंक, प्रोसेस्ड फूड, अनहेल्दी फॅट खाल्ले तर तुम्हाला सुस्ती येईल आणि थकवा जाणवेल.

लोकांनी आपल्या आहारात हेल्दी फॅट, बॅलेन्स डाएट ज्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असले पाहिजेत. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे व्यक्तीला सुस्तपणा जाणवतो. यालाच डिहायड्रेशनला बळी पडणं म्हणतात. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्त घट्ट होऊ लागतं. पोषक तत्व सेल्सपर्यंत पोहोचत नाहीत.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे क्रॅम्प्स आणि स्नायू दुखणे या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळेच भरपूर पाणी प्या, असं म्हटलं जातं. झोप न मिळाल्याने अनेक आजारांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्त वाटू शकतं. रात्री किमान सात ते आठ तास झोपणं फार गरजेचं आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 
 

Web Title: health why do i never feel like getting up in the morning know about details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.