.... 'या' कारणामुळे अनेकांना अंगावर पांघरूण घेतल्याशिवाय झोप येत नाही; जाणून घ्या फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:17 PM2020-07-30T20:17:53+5:302020-07-30T20:27:41+5:30
तुम्हाला कल्पना असेल कोणताही ऋतू असो अनेकांना चादर घेऊन झोपायची सवय असते. यामागंच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रत्येकजण आपला दिनक्रम पूर्ण करून झोपण्याची तयारी करतो. अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची सवय असते. कारण अंघोळ केल्यामुळे चांगली झोप येते. तर अनेकांना रात्री झोपताना पांघरून घेऊन झोपण्याची सवय असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या सवयीनुसार झोपत असतो. झोपताना मनस्थिती चांगली असेल, म्हणजेच मनात वाईट विचार येत नसतील तर चांगली झोप लागते. मात्र, मनात विविध विचारांचे थैमान माजले असेल तर रात्र या कुशीवरून त्या कुशीवर करण्यात जाईल. तुम्हाला कल्पना असेल कोणताही ऋतू असो अनेकांना चादर घेऊन झोपायची सवय असते. यामागंच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जेव्हा व्यक्ती झोपते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान कमी असते. झोपण्याच्या १ तास आधीपासून ही प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे शरीर तापमान नियंत्रणात ठेवण्याची समस्या कमी झालेली असते. व्यक्ती रॅपिड आय मुव्हमेंटमध्येमध्ये पोहोचलेली असते. म्हणजेच स्लीप सायकल सुरू झालेली असते. डोळे बंद करून सौम्य गतीने बुबुळं इकडे तिकडे फिरत असतात. त्यावेळी पांघरूण किंवा चादर व्यक्तीला संपूर्ण रात्रभर गरमी देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीर कापत नाही. याशिवाय रात्री झोपताना शरीर झाकून झोपणं गरजेचं आहे.
माय उपचारशी बोलताना डॉ. मेधावी अग्रवाल यांनी सांगितले की सर्केडियन हे २४ तासांचे चक्र असते. ज्यामुळे रासायनिक, शारीरिक प्रक्रियांनी नियंत्रित करून झोपेचे चक्र प्रभावित होते. त्यामुळे शरीराला कधी झोपायला हवं. कधी उठायला हवं याची जाणीव होते. लहानपणापासून ही प्रक्रिया सुरू होते. २०१५ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार स्लीप मेडिसीन अँड डिर्सोर्डरमध्ये नमुद केले होते की, अंगावर पांघरूण घेऊन झोपल्यानं झोप चांगली येते.
२०२२ मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ ऑक्यूपेशनल थेरेपीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार अंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने चिंता आणि अनिद्रेने पिडित असलेल्या लोकांना शांत झोप लागण्यास मदत होते. अंगावर पांरूण घेऊन झोपल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीच्यावेळी सुरक्षित वाटण्याासाठी पाांघरूण वापरणं गरजेचं आहे. पण पांघरूण घेतल्यानंतर त्याचं कापड असं असावं जेणेकरून तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार नाही.
कोरोनाच्या माहमारीविरुद्ध लढण्यासाठी WHO चं भारताला आवाहन, तज्ज्ञ म्हणाले की.....