Health : ​का २०-३० वयातच पुरुषांना सतावते केस गळतीची समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 09:15 AM2017-09-12T09:15:27+5:302017-09-12T14:45:27+5:30

या चार उपायांनी तरुण टक्कल होण्यापासून थांबवू शकतात, जाणून घ्या ती कारणे...!

Health: Why is the problem of hair leakage in men at 20-30 years of age? | Health : ​का २०-३० वयातच पुरुषांना सतावते केस गळतीची समस्या?

Health : ​का २०-३० वयातच पुरुषांना सतावते केस गळतीची समस्या?

googlenewsNext
ल्या काही वर्षांपासून भारतीय पुरुषांमध्ये अकाली केस गळतीची समस्या वाढतच आहे. केस गळतीच्या समस्येने त्रस्त असण्याºया १० लोकांमध्ये सुमारे आठ पुरुष आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए) नुसार, केस वाढविण्यासाठीची सर्जरी करणाऱ्यांचे प्रमाण २० ते ३० वयोगटामध्येच अधिक आहे. विशेषत: बरेच बॉलिवूड स्टार्सदेखील या समस्येपासून सुटले नाहीत. शेवटी त्यांनी हेअरप्लांटची शस्त्रक्रिया करुन आपल्या लुक बदलला आहे. 
एखाद्या व्यक्तीचे दिवसातून ५० ते १०० केस गळत असतील तर ती गोष्ट सामान्य आहे. मात्र यापेक्षा जास्त केस गळत असतील तर ही समस्या मोठी असू शकते. या समस्येला एलोपेसिया म्हणतात. अकाली केस गळतीच्या समस्येचे सर्वात प्रमुख कारणे म्हणजे मानसिक तणाव, धूम्रपान, मद्यपान, प्रदूषण आणि पौष्टिक आहाराची कमतरता होय.

आयएमएचे अध्यक्ष डॉ. के . के. अग्रवाल यांनी सांगितले की, एलोपेसिया विशेषत: अनुवांशिक असतो. मात्र जीवनशैलीत बदल आणि मानसिक आणि शारीरिक तणावाच्या कारणानेदेखील तरुणांना ही समस्या भेडसावत आहे. विशेषत: तीन महिन्याच्या कालावधित केस गळतात, या व्यतिरिक्त काही आजार जे विषारी पदार्थांपासून होतात, त्या कारणानेही केस गळू शकतात.  

तणावपूर्ण नोकरी आणि जंकफूडची सवय असेल तरीही केस गळतात. यात पोषक तत्त्व आणि फायबरचा अभाव असतो. पूरेशा प्रमाणात पाणी न पिणे, धुम्रपान करणे आणि अल्कोहोलचे अधिक सेवन केल्यानेही अकाली केस गळू शकतात.     

काय उपाय कराल? 
* या समस्येपासून सुटका हवी असल्यास जीवनशैलीत साधारण बदल करणे आवश्यक आहे, ज्यात सात तास गाढ झोप, पूरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन आणि प्रोटिनयुक्त आहाराचे सेवन आदी.   
 
* या व्यतिरिक्त डोक्याचा कोमट तेलाने मसाज करावा, यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगले राहते आणि केसांचे रोम छिद्रे खूले राहतात.  

* योग आणि ध्यानधारणा करून तणावापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे एपिनेफ्रीन आणि कोर्टिसोल हे हार्माेन्स केसांच्या प्राकृतिक विकासात बाधा घालतात. 

* केसांना पोषकत्व मिळण्यासाठी ताजे फळ आणि भाजीपालाचे सेवन करावे. ज्या पदार्थांमध्ये लोह, जस्ता, प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी एसिड भरपूर प्रमाणात आहे अशा पदार्थांचा भरपूर उपयोग करा. या व्यतिरिक्त धुम्रपान आणि मद्यपान करणे टाळावे.      

Also Read : ​Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !
                   : ​HEALTH TIPS : केस गळतीची समस्या आहे, तर रोज ‘हे’ खा !

Web Title: Health: Why is the problem of hair leakage in men at 20-30 years of age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.