HEALTH : ​महिलांनी जीन्स-पॅन्ट परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 08:04 AM2017-07-20T08:04:14+5:302017-07-20T13:35:31+5:30

एका संशोधनानुसार मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास त्यांना लहान वयातच पी.सी.ओ.डी. (पॉली सिस्टिक ओवेरियन डिसीज) हा आजार निर्माण होऊ शकतो.

HEALTH: Women wear jeans-pants because of pregnancy? | HEALTH : ​महिलांनी जीन्स-पॅन्ट परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम?

HEALTH : ​महिलांनी जीन्स-पॅन्ट परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम?

Next
ुतांश चित्रपटात अभिनेत्र्या फॅशनलेबल आणि हटके लूकसाठी जीन्स-पॅन्ट परिधान करतात. आपणही त्या अभिनेत्रीसारखे आकर्षक दिसावे, चारचौघात आपली वेगळी छाप पडावी म्हणून आजची तरुणी सेलिब्रिटींचे अनुकरण करीत तशीच फॅशन करताना दिसत आहे. कॉलेज तरुणी तर जीन्स पॅन्ट, टी-शर्ट आदी तरुणांचाच पेहराव करताना दिसते. मुलींच्या याच पेहरावावरुन समाजामध्ये दोन प्रकारची धारणा निर्माण झाली आहे. एक रूढीवादी आणि दुसरी आधुनिक. रूढीवादी लोक मुलींनी पॅन्ट, जीन्स आणि लहान कपडे परिधान करण्याच्या विरोधात आहेत. तर दुसरीकडे आधुनिक विचारधाराचे लोक मुलगा-मुलगी एक समान समजतात. मुलींच्या कपड्यांवरचा हा वाद गेल्या बऱ्याच पासून सुरु आहे. 

मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास त्यांना लहान वयातच पी.सी.ओ.डी. (पॉली सिस्टिक ओवेरियन डिसीज) हा आजार निर्माण होऊ शकतो. 

या संशोधनात असे म्हटले आहे की, जेव्हा मुली पुरुषांसारखे कपडे परिधान करतात तेव्हा त्या मुलांप्रमाणेच विचार करु लागतात आणि त्यांच्या मेंदूत एक प्रकारे जेंडर रोल रिवर्सल निर्माण होतो. या कारणाने त्यांच्यात कमी वयातच रिप्रॉडक्श्नची नैसर्गिक इच्छा कमी होऊन पी.सी.ओ.डी. सारखा आजार निर्माण होऊ शकतो. याचाच परिणाम त्यांच्या गर्भधारणेवर होऊन त्यांची प्रजनन क्षमता अविकसित होत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.  

मात्र संशोधकांनी या निष्कर्षावर अधिक  संशोधन केले असता, पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रॉम सारखा आजार मुलींचा पेहराव नसून हॉर्मोनल असंतुलन असल्याचे म्हटले आहे. 

Also Read : ​HEALTH : टाइट जीन्स आणि हाय हील्समुळे होतो गंभीर आजार !
     

Web Title: HEALTH: Women wear jeans-pants because of pregnancy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.