जीवघेण्या एड्सच्या आजाराबाबत लोकांच्या मनात आहेत 'हे' ७ गैरसमज, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 06:47 PM2020-05-18T18:47:41+5:302020-05-18T19:19:06+5:30

एचआईवी-एड्स हा आजार लोकांसाठी काही नवीन नाही तरी सुद्धा या आजाराबाबत अनेक गैरसमज प्रचलित आहेत.

Health world aids vaccine day 2020 : 7 false related to hiv positive people myb | जीवघेण्या एड्सच्या आजाराबाबत लोकांच्या मनात आहेत 'हे' ७ गैरसमज, जाणून घ्या सत्य

जीवघेण्या एड्सच्या आजाराबाबत लोकांच्या मनात आहेत 'हे' ७ गैरसमज, जाणून घ्या सत्य

googlenewsNext

जगभरात आज "वर्ल्ड एड्स वॅक्सीन डे" साजरा केला जातो. एचआईवी-एड्स हा आजार लोाकांसाठी काही नवीन नाही तरी सुद्धा या आजाराबाबत अनेक गैरसमज प्रचलित आहेत. हा आजार औषधांनी नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो. आत्तासुद्धा अनेकांना असं वाटतं की एचआयव्ही पॉजिटिव्ह व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर हा आजार पसरतो. पण हा आजार एखाद्याला स्पर्श केल्यामुळे उद्भवत नाही. लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती तयार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 

एचआयव्ही पॉजिटिव्ह व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर हा व्हायरस पसरत नाही. एचआयव्ही असलेल्या व्यक्तीला स्पर्श केल्यास किंवा हात मिळवल्यानंतर या व्हायरसचं संक्रमण होत नाही.  

काहीजणांचा असा समज आहे की, एचआयव्ही पॉजिटिव्ह  डास एखाद्या व्यक्तीला चावला तर त्या व्यक्तीला या आजाराचं संक्रमण होऊ शकतं. पण कोणताही डास चावल्यानंतर एचआयव्ही पसरत नाही. कारण डासांच्या शरीरात हा व्हायरस जीवंत राहू शकत नाही. 

या आजाराने संक्रमित असलेल्या व्यक्तीला किस केल्यामुळे एड्स होतो. असा अनेकांचा समज आहे. पण हा आजार किस केल्यामुळे पसरत नाही तर सेक्शुअली संपर्क झाल्यास हा आजार पसरतो. 

एचआयवी  पॉजिटिव्ह व्यक्तीने कपडे किंवा त्या व्यक्तीने हात लावलेल्या कोणत्याही वस्तूपासून पसरतो. असा गैरसमज लोकांच्या मनात आहे. एचआईव्हीने पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तीने वापर केलेल्या बाथरूमचा वापर केल्यास  हा आजार पसरत नाही. हा व्हायरस सीमेन, लाळ आणि रक्तामार्फत पसरतो.

एचआयवी एड्स वातावरणातील हवेमार्फत श्वासामार्फत पसरत नाही. तसंच संक्रमित व्यक्तीकडून वस्तूंची देवाण केल्यामुळेसुद्धा हा आजार पसरत नाही. व्यायाम करत असताना उपकरणांचा स्पर्श केल्यास हा आजार पसर शकत नाही.  
 

'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत

कोरोना विषाणूंमुळेच नाही तर 'या' समस्येमुळे होतो श्वास घ्यायला त्रास, वेळीच जाणून घ्या लक्षणं

Web Title: Health world aids vaccine day 2020 : 7 false related to hiv positive people myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.