मासिक पाळीदरम्यान वजन वाढल्यासारखं जाणवतंय? जाणून घ्या नक्की काय कारण आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 01:55 PM2018-09-04T13:55:27+5:302018-09-04T13:57:56+5:30
अनेकदा मासिक पाळीमध्ये स्त्रियांना असं वाटतं की, आपल वजन तर वाढलं नाही ना. अनेकदा तर कपडेदेखील थोडे घट्ट झाल्यासारखे जाणवतात.
अनेकदा मासिक पाळीमध्ये स्त्रियांना असं वाटतं की, आपल वजन तर वाढलं नाही ना. अनेकदा तर कपडेदेखील थोडे घट्ट झाल्यासारखे जाणवतात. अनेकदा आपण दुर्लक्ष करतो, पण अनेकदा विचारातही पडतो. पण तुम्हाला जे जाणवत असतं ते अगदी योग्य असतं. कारण मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे शरीराचं वजन आपोआप वाढतं. जाणून घेऊयात मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल चेंजेसमुळे होणाऱ्या बदलांबाबत तसेच याव्यतिरिक्त महिलाही या दरम्यान अशी काही कामं करतात की, ज्यामुळे त्यांच वजन वाढतं.
हार्मोनल चेंजेस
अनेकदा मासिक पाळीदरम्यान हार्मोनल चेंजेस होतात त्यामुले पोट फुगण्याची समस्या होत असून वजन देखील वाढतं. हे बदल प्रत्येक महिलेच्या शरीरात होतात. त्यामुले अशा दिवसांमध्ये डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
जंक फूडला करा बाय बाय
मासिक पाळीदरम्यान चुकूनही जंक फूड खाऊ नका. कारण यामुळे फार कमी वेळात तुमचं जास्त वजन वाढतं. त्याचबरोबर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
वर्क आउट करू नका
मासिक पाळीच्या दिवसांत चुकूनही वर्क आउट करू नका. कारण असं केल्याने तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच शरीरातील इतक अवयवांनाही त्रास होऊ शकतो.
चहा कॉफी जास्त पिऊ नका
मासिक पाळीदरम्यान चुकूनही जास्त चहा किंवा कॉफीचं सेवन करणं टाळा. यामध्ये कॅफेनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान अॅसिडीटी, पोटदुखी यांसारखे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता अधिक असते.