HEALTH : वृद्धापकाळात योगामुळे टळतो ‘मेमरी’ कमजोर होण्याचा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 07:57 AM2017-07-18T07:57:29+5:302017-07-18T13:27:52+5:30

जास्त काळ योगा केल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो म्हणजेच वृद्धापळात होणारे स्मृतिभ्रंश सारख्या आजारांपासून बचाव होतो.

HEALTH: Yoga prevails because of old age; the risk of 'memory' becoming weak! | HEALTH : वृद्धापकाळात योगामुळे टळतो ‘मेमरी’ कमजोर होण्याचा धोका !

HEALTH : वृद्धापकाळात योगामुळे टळतो ‘मेमरी’ कमजोर होण्याचा धोका !

googlenewsNext
गाचे फायदे सर्वज्ञात आहेत. त्यामुळे योगा सेलिब्रिटींच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच बनला आहे. योगामुळे शरीर तर फिट राहतेच शिवाय सौंदर्यातदेखील भर पडते. या व्यतिरिक्त नव्या संशोधनानुसार, वृद्धापकाळात योगा केल्यास मेमरी कमजोर होण्याचा धोका टळतो असे आढळून आले आहे.  
जर्नल फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसाइंसच्या संशोधनात असे म्हटले आहे की, जास्त काळ योगा केल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो म्हणजेच वृद्धापळात होणारे स्मृतिभ्रंश सारख्या आजारांपासून बचाव होतो.  

शिवाय ब्राझिलच्या साओ पाउलोमधील हॉस्पिटल इजरैलिटा अल्बर्ट आइंस्टीनचे संशोधक एलिसा कोजासा यांनी म्हटले आहे की, मांसपेशींसारखेच मेंदूही प्रशिक्षणाने विकसित होत असतो.  

वय वाढल्याने मेंदूची संरचना आणि कार्यक्षमतामध्ये बदल घडत असतो आणि यामुळे लक्ष, स्मृतिमध्ये कमजोरी निर्माण होते. शिवाय या दरम्यान मेंदूत एक असा बदल घडतो, ज्यामध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होतो.
 
संशोधकांनी योगा करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या मेंदूची छायाकृती घेतली तर त्यांना तिच्या उजव्या पीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये अधिक कॉर्टिकलची जाडी जास्त दिसून आली.  

योग भारताची प्राचीन परंपरेची एक अमुल्य देण आहे. योगा मेंदू आणि शरीराच्या एकतेचे प्रतिक आहे, मनुष्य आणि निसर्गादरम्यान सामंजस्य आहे. विचार, संयम आणि स्फुर्ती देणारा तथा आरोग्य आणि सकारात्मकतेसाठी एक सक्षम दृष्टिकोनदेखील योगामुळेच मिळतो. 

वृद्धापकाळाने नियमित योगा केल्यास मेंदूच्या संरचनेत असा बदल घडत असतो. आणि हाच बदल मेमरी स्ट्रॉँग होण्यास कारणीभूत ठरतो. 
बहुतांश वृद्ध सेलिब्रिटी याच फायद्यामुळे नियमित योगा करीत असतात आणि आपले जीवन सुकर करीत असतात.    

Also Read : मेंदू आणि शरीराच्या एकतेचे प्रतिक, योगा !      

Web Title: HEALTH: Yoga prevails because of old age; the risk of 'memory' becoming weak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.