अनेकांना माहीत नसतील पेरूच्या पानांचे 'हे' आरोग्यादायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 01:08 PM2019-02-22T13:08:56+5:302019-02-22T13:13:01+5:30

पेरू म्हणजे सर्वांच्याच आवडीचं फळं. तिखट मीठ लावून खाल्लेल्या पेरूची बात काही औरच... पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे पेरूची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Healthy benefits of guava leaves or peruchi paana | अनेकांना माहीत नसतील पेरूच्या पानांचे 'हे' आरोग्यादायी फायदे!

अनेकांना माहीत नसतील पेरूच्या पानांचे 'हे' आरोग्यादायी फायदे!

googlenewsNext

पेरू म्हणजे सर्वांच्याच आवडीचं फळं. तिखट मीठ लावून खाल्लेल्या पेरूची बात काही औरच... पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे पेरूची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही ही पानं अत्यंत लाभदायक ठरतात. वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासोबतच पोटाच्या समस्या दूर राहण्यासाठीही मदत करतात. तसेच शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी जालं असेल तर ती दूर करण्याचेही काम पेरूची पानं करतात. जाणून घेऊया पेरूच्या पानांच्या फायद्यांबाबत...

(Image Credit : Asian Voice)

- पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून दातांवर लावल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. 

- केसांसाठी पेरूची पानं अत्यंत फायदेशीर ठरतात. या पानांमध्ये केसांसाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे केसांच्या वाढिसाठी उपयोगी ठरतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन-सी अधिक असतं. तसेच पेरूच्या पानांमध्ये आयर्नही असतं. जे केसांच्या वाढिसाठी उपयोगी ठरतं. 

- तुमचे केस गळत असतील तर त्यावर उपाय म्हणून या पानांचा वापर करू शकता. या पानांच्या मदतीने एक काढा तयार करून त्याने केसांच्या मुळाजवळ मालिश करा.
- अनेकदा विविध कारणांनी शरीराच्या अनेक भागांमध्ये गाठी तयार होतात. यातील अनेक गाठी वेदनादायी असतात तर काही न दुखणाऱ्या. असा गाठींवर जर पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून लावली तर त्याचा फायदा होतो.
 
- काहींना महिलांना अंगावरून पांढरं जाण्याची समस्या होते. अनेकदा शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेमुळेही हा त्रास होत असतो. परंतु हे प्रमाण वाढू लागल्यास त्यावर वेळीच उपचार करणं फायदेशीर ठरतं. पेरूची पानं या समस्येवर उपयोगी ठरतात. दररोज संध्याकाळी या पानांचा रस घेतल्याने या समस्या कमी होण्यास मदत होते. 

- पिंपल्स दूर करण्यासाठी पेरूची पानंही उपयोगी ठरतात. या पानांमध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल आणि जलनरोधी गुणधर्म असतात. ज्याच्या मदतीने त्वचेच्या समस्या म्हणजेच, अॅक्ने, पूरळ, अॅलर्जी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

- डायरियाच्या आजारांवर पेरूची पानं उपयुक्त ठरतात. लहान मुलांना डायरिया झाल्यास या पांनाचा रस गुणकारी ठरतो.  पोटाच्या इतर समस्यांवर याचा उपयोग होतो. एक कप पाण्यामध्ये ही पानं टाकून पाणी उकळवून घ्यावं. तसेच हे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. 

-  वजन कमी करण्यासाठी पेरूची पानं उपयुक्त ठरतात. शरीरातील फॅट नियंत्रणात ठेवण्यासाठी या पानांमध्ये असणारे गुणधर्म मदत करतात. पेरूची पानं सुकवून त्याची पावडर करून ठेवा. पाण्यामध्ये एकत्र करून घेतल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

टीप : प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. अनेकांना काही गोष्टींची अॅलर्जी असते. 

Web Title: Healthy benefits of guava leaves or peruchi paana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.