हिरव्या मिरचीचं पाणी पिण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कसं कराल तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 10:18 AM2024-05-01T10:18:09+5:302024-05-01T10:23:02+5:30
Green chillies water: हिरव्या मिरचीचं पाणी पिऊनही शरीराला अनेक फायदे मिळतात. या पाण्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊन हिरव्या मिरचीच्या पाण्याचे फायदे...
Green chillies water: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या फूड्सचं, भाज्यांचं आणि फळांचं सेवन करतात. सगळ्यांच्या किचनमध्ये सहज सापडणाऱ्या हिरव्या मिरचीचाही वापर अनेक पदार्थ आणि भाज्यांमध्ये केला जातो. हिरव्या मिरचीचा ठेचा, हिरवी मिरची खाऊन शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हिरव्या मिरचीचं पाणी पिऊनही शरीराला अनेक फायदे मिळतात. या पाण्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊन हिरव्या मिरचीच्या पाण्याचे फायदे...
इन्फेक्शनपासून बचाव
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आढळतं आणि सोबतच वेगवेगळे अॅंटी-ऑक्सिडेंट्सही यात भरपूर असतात. हे तत्व तुमच्या शरीराला इन्फेक्शन, वायरस आणि वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करतात. सोबतच हिरव्या मिरचीमध्ये बीटा केरोटीनही आढळतं. याने तुमची इम्यून पॉवरही वाढते.
शुगर लेव्हल
डायबिटीसच्या रूग्णांसाठी हिरव्या मिरचीचं पाणी त्यांची शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्याचा चांगला उपाय आहे. हिरव्या मिरचीचं पाणी प्यायल्याने शुगर लेव्हल एकाएकी वाढत नाही आणि कंट्रोल राहते.
डायजेस्टिव पॉवर वाढते
हिरव्या मिरचीमध्ये डायटरी फायबर आढळतं. मिरची खाल्ल्याने किंवा याचं पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते आणि तुमचं डायजेशनही चांगलं राहतं.
वेट लॉस ड्रिंक
हिरव्या मिरचीचं पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी वेगाने बर्न होण्याची प्रोसेस वाढते. तसेच याने पचनशक्ती आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. यामुळे तुमचं वजन वेगाने कमी होतं.
कसं कराल तयार
रात्री झोपण्याआधी 3 ते 4 हिरव्या मिरच्या धुवून घ्या आणि मिरचीच्या मधे चिरा मारा. या मिरच्या एक ग्लास पाण्यात बुडवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर हे पाणी प्यावे. पाणी पिण्याआधी काही खाऊ किंवा पिऊ नका. यासाठी तुम्ही एक्सपर्टचा सल्लाही घेऊ शकता.