Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 09:31 AM2021-03-14T09:31:11+5:302021-03-14T09:48:34+5:30
Healthy Breakfast Ideas : अगदी कमीत कमी खर्चात तुम्ही आठवड्याभराच्या नाष्त्याचं प्लॅनिंग करू शकता. जेव्हा कधीही भूक लागते आणि झटपट काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा हेल्दी फूड म्हणून अनेकजण पोहे बनवतात.
सकाळचा नाष्ता हा दिवसभरातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे. सकाळचा नाष्ता व्यवस्थित केला तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अनेकदा घाईघाईत आपण व्यवस्थित नाष्ता करत नाही तसंच कमी कॅलरिज असलेलं आणि पौष्टीक असं काय खाता येईल असा विचार आपण नेहमीच करतो. आज आम्ही तुम्हाला कमी कॅलरीजचा नाष्ता करण्यासाठी काही बेस्ट ऑप्शन्स सांगणार आहोत. अगदी कमीत कमी खर्चात तुम्ही आठवड्याभराच्या नाष्त्याचं प्लॅनिंग करू शकता. जेव्हा कधीही भूक लागते आणि झटपट काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा हेल्दी फूड म्हणून अनेकजण पोहे बनवतात. सकाळच्या नाष्त्याला पोहे खाणं हा उत्तम पर्याय आहे. अनेक घरांमध्ये दर दोन दिवसांनी पोह्यांचा नाष्ता असतो. तर काही घरात बाहेरून आणलेले नाष्त्याचे पदार्थ खाल्ले जातात. आज आम्ही तुम्हाला पोहे खाण्याचे फायदे आणि प्रकार सांगणार आहोत.
कांदे पोहे
तुम्ही सकाळच्या नाष्त्याला कांदा, बटाटा घालून आणि राई, जिर्याची फोडणी देऊन शेंगदाण्यांसह पोहे खाण्याचा आनंद घेऊ शकता.
सोया पोहे
अतिशय चवदार, हलकी आणि बनवण्यास सोपी पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला सोयाची गुणधर्म मिळतील. यासह आपण आपला दिवस निरोगी मार्गाने सुरू करू शकता.
क्रॅनबेरी बदाम पोहे
हे पोहे हेल्दी असून पौष्टिक पदार्थ समृद्ध आहे जे तुम्ही सहज घरी बनवू शकता. बदाम आणि क्रॅनबेरी फ्लेवर्समध्ये भरलेला हा पोहा खूप फायदेशीर आहे. या पोह्याची खास गोष्ट म्हणजे शून्य कोलेस्ट्रॉलबरोबर प्रथिने आणि कॅल्शियमचे बरेच प्रमाण आहे. यात तुम्ही इतरही फळं घालून खाऊ शकता.
लाल तांदूळ पोहे
लाल तांदळापासून बनवलेल्या या पोह्याचे असंख्य आरोग्यासाठी फायदे आहेत कारण इतर तांदूळांपेक्षा लाल तांदळावर प्रक्रिया कमी होते.
स्टिम पोहे
स्टीम्ड पोहे बनविणे खूप सोपे आहे आणि आपणसुद्धा काही मिनिटांत ते बनवून आनंद घेऊ शकता.
फायदे
पोह्यांमध्ये 75 % कार्बोहाइड्रेट आणि 25 % फॅट्स असतात. हे खाल्याने शरीरामध्ये हेल्दी फॅट्सची कमतरता भासत नाही. म्हणूनच पोहे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पोह्याच्या सेवनानं पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही नाष्त्यासाठी कोणतेही बाहेरचे पदार्थ खात असाल तर ते पचण्यास वेळ लागतो. पण नाष्त्याला पोहे खाल्यास पचायला फारसा वेळ लागत नाही.
पोहे एक फाइबर युक्त एक लाइटफूड आहे. पचनासाठी चांगले असून शरीराला दीर्घकाळ उर्जा मिळण्यास मदत होते.
पोह्यात खूप कमी कॅलरिज असतात. जर तुम्हाल वजन कमी करायचं असेल तर ब्रेड बटर किंवा टोस्ट वैगेरे खाणं सोडून द्या आणि पोह्याचा नाष्ता करा. यामुळे तुम्हाला उर्जा मिळेल तसंच वजन कमी होण्यास मदत होईल. शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढता येते.
पोहे बनवत असताना शेंगदाणे कधी बटाटे, अन्य ड्रायफ्रुट्स आणि कांद्यांचा वापर केला जातो. पोह्यांच्या सेवनानं शरीराला पोषण मिळतं. तसंच खाताना वेगवेगळ्या चवींचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. चवीनं खाण्याबरोबरच पोषणही मिळत असल्यामुळे पोह्याचा समावेश नाष्त्यासाठी करायला हवा.
नाष्त्याला पोहे खाल्याने दुसरं काही खाण्याची गरज भासत नाही. पोहे खाल्यानं पोट भरतं. पोह्यात कार्बोहायड्रेट्स असतात. दिवसाची चांगली सुरूवात होण्यासाठी तसंच उर्जा मिळण्यासाठी पोहे हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
पोहे बनवत असताना शेंगदाणे कधी बटाटे, अन्य ड्रायफ्रुट्स आणि कांद्यांचा वापर केला जातो. पोह्यांच्या सेवनानं शरीराला पोषण मिळतं. तसंच खाताना वेगवेगळ्या चवींचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. चवीनं खाण्याबरोबरच पोषणही मिळत असल्यामुळे पोह्याचा समावेश नाष्त्यासाठी करायला हवा.