By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2016 02:56 PM2016-09-18T14:56:04+5:302016-09-18T20:26:04+5:30
फिनलँडमध्ये झालेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे
Next
/>शाळेत जाणाऱ्या मुलांना प्रांरभी तीन वर्ष निरोगी आहार मिळाला. तर त्या मुलांचे मोठ्या प्रमाणात अभ्यास कौशल्य विकसीत होते. फिनलँडमध्ये झालेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ६ ते ८ वयोगटातील १६१ मुलांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. ज्या मुलांनी आहारात भाज्या, फळे यांचे सेवन केले तर त्यांची प्रगती उत्तम असल्यााचे समोर आले. निरोगी आहार हा मुलांचे शैक्षणीक कौशल्य विकसित करण्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे शाळेत मुलाचे नाव टाकल्यानंतर त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याबरोबरच आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. आहार चांगला असेल तेव्हाच त्यांचा अभ्यास चांगला होऊ शकतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे. फिनलँडमधील ईस्टर्न विद्यापीठाने हे संशोधन केले आहे.
Web Title: A healthy diet to develop practice skills