फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी काय खावं? लिव्हर फेल होण्याचा टळेल धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:49 AM2024-10-25T10:49:35+5:302024-10-25T10:57:19+5:30

Foods for Fatty Liver : फॅटी लिव्हरची लक्षण कमी करण्यासाठी आहारात काही बदल करू शकता. आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या ठीक करण्यासाठी काय खावं हे सांगणार आहोत.

Healthy diet for fatty liver problem you should know | फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी काय खावं? लिव्हर फेल होण्याचा टळेल धोका!

फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी काय खावं? लिव्हर फेल होण्याचा टळेल धोका!

Foods for Fatty Liver : आजकाल बऱ्याच लोकांना फॅटी लिव्हरची समस्या होत आहे. लठ्ठपणा, डायबिटीससारखीच फॅटी लिव्हरची समस्या खाण्या-पिण्यात असंतुलन झाल्याने होते. फार जास्त मद्यसेवन केल्या आणि चुकीच्या आहारामुळे लिव्हरवर फॅट जमा होतं. ज्याला फॅटी लिव्हर म्हटलं जातं. जर वेळीच या समस्येवर योग्य ते उपाय केले गेले नाही तर लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर फेलिअर होऊ शकतो. अशात फॅटी लिव्हरची लक्षण कमी करण्यासाठी आहारात काही बदल करू शकता. आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या ठीक करण्यासाठी काय खावं हे सांगणार आहोत.

कसा असावा आहार?

फॅटी लिव्हरमध्ये तुमचा फोकस फॅट कमी करण्यावर असला पाहिजे. यादरम्यान रूग्णाने हिरव्या पालेभाज्यांचं अधिक सेवन करावं. फॅटी लिव्हरच्या रूग्णांनी आपल्या डाएटमध्ये पालक, मेथी, शेवगा अशा भाज्यांचा समावेश करावा. या भाज्यांचं सेवन तुम्ही सलाद आणि सूपच्या माध्यमातूनही करू शकता. लिव्हरवरील सूज कमी करण्यासाठी अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असलेले फूड्स महत्वाचे ठरतात. अशात हळदीचं सेवन करा. हलदीचा चहा सेवन करणं फायदेशीर ठरतं. तसेच ग्रीन टी चं सुद्धा सेवन करू शकता.

लिव्हर डिटॉक्स फूड्स

फॅटी लिव्हरची समस्या झाल्यावर लिव्हर डिटॉक्स करणाऱ्या पदार्थांचं किंवा फळांचं तुम्ही सेवन करू शकता. यासाठी सफरचंद सगळ्यात चांगला पर्याय आहे. सफरचंदामध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. जे लिव्हरसाठी खूप फायदेशीर असतात. अशात फॅटी लिव्हरच्या रूग्णांनी रोज एक सफरचंद खावं. लिव्हरमध्ये फॅट जमा होऊ न देण्यात फायबरची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन करा. यासाठी दलिया, ओट्स, कडधान्य, ब्राउन राइस, ज्वारी यांचा आहारात समावेश करा. तसेच लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही नियमितपणे अक्रोड आणि बदामाचं सेवन करा.
 

Web Title: Healthy diet for fatty liver problem you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.