हायपरटेन्शनची शिकार होतायत लहान मुलं; आहारातील बदल करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 03:29 PM2019-04-24T15:29:14+5:302019-04-24T15:34:33+5:30

सध्याच्या अनियमित लाइफस्टाइलमुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अशातच ही बाब अत्यंत गंभीर होते जेव्हा यामुळे लहान मुलांनाही अनेक गंभीर आजारांनी ग्रासले जाते.

Healthy diet for kids helps in high blood pressure | हायपरटेन्शनची शिकार होतायत लहान मुलं; आहारातील बदल करतील मदत

हायपरटेन्शनची शिकार होतायत लहान मुलं; आहारातील बदल करतील मदत

Next

(Image Credit : MomJunction)

सध्याच्या अनियमित लाइफस्टाइलमुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अशातच ही बाब अत्यंत गंभीर होते जेव्हा यामुळे लहान मुलांनाही अनेक गंभीर आजारांनी ग्रासले जाते. सध्या अगदी लहान मुलंही डायबीटीज आणि हायपरटेंशन यांसारख्या आजारांच्या विळख्यात अडकली आहेत. हाय ब्लड प्रेशर मुलांमध्ये अगदी कॉमन झाला आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, 6 वर्षांपर्यंत मुलांमध्ये हायपरटेन्शन एखाद्या औषधाच्या साइडइफेक्ट्समुळे होतो. तसेच त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये वजन आणि इतर लाइफस्टाइल प्रॉब्लेम्समुळे हा आजार होऊ शकतो. 

पालकांनी मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांनी मुलांचं हेल्थ चेकअप करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा मुलं सतत डोकं दुखत असल्याचं किंवा उलट्या, चक्कर येणं, श्वास घेण्यासाठी त्रास होणं यांसारख्या तक्रारी करत असतील तर त्वरित मुलांचं ब्लड प्रेशर चेक करून घ्या. हाय-ब्लड प्रेशरवर उपचार करण्याची सुरुवात सर्वात आधी घरापासूनच करा. मुलांच्या लाइफस्टाइलमध्ये थोडेसे बदल करा.

हेल्दी डायट 

जर तुमचं मुल हाय बीपीची औषधं घेत असेल तर त्यासाठी घरीच त्यांच्या दिनक्रम आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणं गरजेचं असतं. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मुलं काय आहार घेतात या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यांच्या डाएटमध्ये पोषक पदार्थांचा समावेश करा. मुलांना जंक फूडपासून दूर ठेवा आणि हेल्दी पदार्थांची गोडी लावा. त्याच्या आहारामध्ये फळं आणि भाज्या मुबलक प्रमाणात असणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त व्होलग्रेन आणि लो फॅट डेअरी प्रोडक्ट्सचाही समावेश करा. 

जेवणामध्ये फॅट आणि शुगरचे प्रमाण कमी करून तुम्हाला प्रोटीनचे प्रमाण वाढवणं गरजेचं असतं. डाळ, बीन्स, मासे यांसारखे पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करा. 

मीठ 

जर तुमच्या मुलांना हाय ब्लड प्रेशर असेल तर त्याच्या आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवा. 4 ते 8 वर्षांच्या मुलांना एका दिवसामध्ये 1200 मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ देऊ नये. त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना एका दिवसात 1500 मिलीग्राम मीठ देणं गरजेचं असतं. पॅकेज्ड फऊड ज्यामध्ये मीठ आणि फॅट्स अधिक प्रमाणात असतात. मुलांना शक्यतो या फूड्सपासून दूरचं ठेवा. 

(Image Credit : rd.com)

फिजिकल अ‍ॅक्टिव्हीटी 

मुलांना आउटडोर अ‍ॅक्टिव्हीटीजची सवय लावा. त्यांना बाहेर खेळण्यासाठी पाठवा. त्याचबरोबर वॉकसाठी जा आणि सायकलिंग करण्यासाठीही सांगा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

Web Title: Healthy diet for kids helps in high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.