पुरुषांनी चिक्कूचे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासह 'हे' होतील फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 05:17 PM2020-05-06T17:17:27+5:302020-05-06T17:24:37+5:30
चिक्कूमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे घरी बसून तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवत असतील म्हणजेच थकवा येणं, अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही बाजारात सहज उपलब्ध होत असलेल्या चिक्कूचा आहारात समावेश करू शकता. पुरुषांनी चिक्कूचे सेवन केल्यामुळे अनेक फायदे मिळतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. चिक्कूमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. कारण मादक पदार्थाचे सेवन केल्यामुळे अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते.
पोषक घटक
चिक्कूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्वे असतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी यात अधिक प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमीत चिक्कू खाल्ले तर तुमची त्वचा हेल्दी आणि मॉइश्चराइज होईल. अॅंटी-ऑक्सिडेंट असल्या कारणाने या फळामुळे त्वचेवर होणाऱ्या सुरकुत्यांपासूनही बचाव करता येईल.
हाडांची बळकटी
वाढत्या वयात हाडं कमकुवत व्हायरला सुरूवात होते. हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात ते कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्स. चिक्कूमध्ये हे सर्व मिनरल्स आढळतात. त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी तुम्ही आजच चिक्कूचं सेवन करायला सुरुवात करा.
पचनक्रिया
सध्या लॉकडाऊनमुळे पुरेशी हालचाल होत नाही. परिणामी पचनक्रिया बिघडणं पोट साफ न होणं अशा समस्या उद्भवतात. चिक्कूचे सेवन करून तुम्ही ही समस्या कमी करू शकता. फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या फळांनी पचनक्रिया चांगली होते. याने आतड्याही चांगल्या राहतात. चिक्कूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं, ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारची औषधे तयार करण्यासाठीही केला जातो. तसेच चिक्कू खाल्ल्याने पोटाची समस्याही दूर होते. (हे पण वाचा-युटीआय आणि यीस्ट इन्फेक्शनमध्ये 'हा' आहे फरक, लागण होण्याआधी जाणून घ्या लक्षणं)
सर्दी खोकला बरा होतो
सध्या कोरोनामुळे लोक कोणत्याही कारणामुळे आजारी पडले तरी घाबरतात. अशावेळी चिक्कू खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चिक्कू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो. याने तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो. अनेकांचा असा समज असतो की, हे फळ थंड असल्याने याने सर्दी होते, पण हा समज चुकीचा आहे. या फळामुळे सर्दी बरी होते. (हे पण वाचा-हृदय विकारांचे संकेत ठरू शकतात सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे)