फुप्फुसातील सगळे विषारी पदार्थ पडतील बाहेर, डॉक्टरांनी सांगितला एक सोपा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:51 AM2024-07-26T10:51:59+5:302024-07-26T10:52:45+5:30
Healthy Drink For Lungs : वाढतं प्रदूषण आणि स्मोकिंगच्या सवयीमुळे फुप्फुसं कमजोर होतात. यात विषारी पदार्थ जमा होतात. ज्यामुळे वेगवेगळे गंभीर समस्या होतात.
Healthy Drink For Lungs : श्वास घेतल्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. श्वास घेणं हे किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. श्वास घेण्यात फुप्फुसांची सगळ्यात महत्वाची भूमिका असते. फुप्फुसं हवेतील ऑक्सिजन खेचतात आणि आपल्या पूर्ण शरीरात पोहोचवतात. पण वाढतं प्रदूषण आणि स्मोकिंगच्या सवयीमुळे फुप्फुसं कमजोर होतात. यात विषारी पदार्थ जमा होतात. ज्यामुळे वेगवेगळे गंभीर समस्या होतात.
स्मोकिंग करणाऱ्या लोकांच्या फुप्फुसांमध्ये टार जमा झालेलं असतं. हे बाहेर काढण्यासाठी डॉक्टर प्रियंका त्रिवेदी यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे. या उपायाने फुप्फुसांसोबतच लिव्हरलाही मदत मिळते. याने त्वचा आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं.
स्मोकिंगने लंग्स इन्फेक्शनचा धोका
डॉ. प्रियंका त्रिवेदी यांच्यानुसार, जे लोक स्मोकिंग करतात, त्यांना फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. काही लोकांना अस्थमामुळेही फुप्फुसांमध्ये समस्या होते. त्यासोबतच लिव्हरवर सूज येण्याची समस्याही आजकाल खूप वाढली आहे.
25 दिवसांचा उपाय
डॉक्टरांनुसार, या समस्या दूर करण्यासाठी लोक एका खास ड्रिंकचं सेवन करू शकतात. हे ड्रिंक तुम्ही रात्री तयार करून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्यानंतर रात्री झोपण्याआधी याचं सेवन करा. या उपायाचा रिझल्ट तुम्हाला 20 ते 25 दिवसात दिसून येईल. डॉक्टर म्हणाल्या की, जर शक्य असेल तर हे ड्रिंक तुम्ही आयुष्यभर सेवन करा.
हे ड्रिंक पिण्याचे फायदे
फुप्फुसांचं इन्फेक्शन बरं होईल
फुप्फुसं हेल्दी होतील
लिव्हर हेल्दी राहणार
किडनी हेल्दी राहणार
त्वचा आणि केसही हेल्दी राहणार
हे ड्रिंक कसं कराल तयार?
एक लीटरची काचेची बॉटल घ्या
यात एक लीटर साधं पाणी टाका
एका लिंबाचे पातळ स्लाईस करून यात टाका
एका कारल्याचे पातळ स्लाईस करून यात टाका
10 ते 15 पुदीन्याची पाने टाका
काही आल्याचे स्लाईस टाका
हे ड्रिंक फ्रिजमध्ये रात्रभर ठेवा
सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक नॉर्मल करून सेवन करा.