हिवाळ्यात वाढणारं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळं करतं मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 02:09 PM2019-10-23T14:09:54+5:302019-10-23T14:13:08+5:30
हिवाळ्यात वाढणाऱ्या वजनाचा सामना करावा लागतो. यामुळे आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात. अशातच या दिवसांत वाढणाऱ्या वजनापासून सुटका करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
द्राक्षं चवीला आंबट-गोड असतात. थंडीमध्ये चांगल्या क्वॉलिटीची द्राक्षं आरामात बाजारात उपलब्ध होतात. पंरतु, कॅलरी किंवा फ्रुक्टोजमुळे तुम्ही द्राक्षांपासून दूर राहता का? मग तुम्ही स्वतःचं फार नुकसान करताय. कारण द्राक्षांमध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व असतात. जाणून घेऊया द्राक्षांमुळे होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं...
काळ्या द्राक्षांमध्ये असलेलं फ्लेवेनॉइड्स शरीरामधील चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं. यामुळे कोरोनरी हार्ट डिजिजपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच कार्डियोवॅल्क्युलर हेल्थ सुधारण्यासाठीही फायदा होतो.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवून आजार ठेवतं दूर
काळी द्राक्षं शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवून एक सुपरफूडप्रमाणे काम करतात. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. द्राक्ष वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच तुम्ही हेल्दी, एनर्जेटिक आणि तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतं.
मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी
द्राक्षामध्ये मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी मदत करणारे गुमधर्म असतात. विविध संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, ज्या व्यक्ती द्राक्षांचा आहारात समावेश करतात. त्यांचा मेटाबॉलिक रेट उत्तम असतो. त्यामुळे हे अगदी छोटं फळ तुम्हाला स्लिम दिसण्यासाठी मदत करतात. वर्कआउट केल्यानंतर द्राक्षांचा ज्यूस पिण्याचा सल्ला अनेक हेल्थ एक्सपर्ट्स देतात. अशाप्रकारे तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट्स, पाणी आणि व्हिटॅमिन सी मिळतं. त्याचबरोबर वजन मेन्टेन करण्यासाठी मदत होते.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)