एन्जीओप्लास्टी मोफत करण्यासाठी तरतूद करू आरोग्यमंत्र्यांची माहिती : जिल्‘ातील रुग्णांना स्वस्तात रक्त मिळण्यासाठी जी.एम.फाउंडेशन व रक्तपेढीत करार

By admin | Published: January 9, 2016 11:22 PM2016-01-09T23:22:49+5:302016-01-09T23:22:49+5:30

जळगाव- दुष्काळी स्थिती आरोग्याविषयीची गंभीर समस्या निर्माण झाली तर उपचार करणे शक्य होत नाही. यामुळे महाआरोग्यशिबिरे राज्यभर व्हायला हवीत. मराठवाड्यात त्यासंबंधी काम सुरू झाले आहे. राज्य शासनही यापुढे विविध योजनांच्या माध्यमातून एन्जीओप्लास्टी विनामूल्य कशी होईल, त्यासाठी लागणारी स्टेण्ट मोफत उपलब्ध होईल यासाठी तरतूद करील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी महाआरोग्यशिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.

Healthy Information to Make Free for Angioplasty: GM Foundation and Blood Banking Agreement to Get Healthy Blood For Patients | एन्जीओप्लास्टी मोफत करण्यासाठी तरतूद करू आरोग्यमंत्र्यांची माहिती : जिल्‘ातील रुग्णांना स्वस्तात रक्त मिळण्यासाठी जी.एम.फाउंडेशन व रक्तपेढीत करार

एन्जीओप्लास्टी मोफत करण्यासाठी तरतूद करू आरोग्यमंत्र्यांची माहिती : जिल्‘ातील रुग्णांना स्वस्तात रक्त मिळण्यासाठी जी.एम.फाउंडेशन व रक्तपेढीत करार

Next
गाव- दुष्काळी स्थिती आरोग्याविषयीची गंभीर समस्या निर्माण झाली तर उपचार करणे शक्य होत नाही. यामुळे महाआरोग्यशिबिरे राज्यभर व्हायला हवीत. मराठवाड्यात त्यासंबंधी काम सुरू झाले आहे. राज्य शासनही यापुढे विविध योजनांच्या माध्यमातून एन्जीओप्लास्टी विनामूल्य कशी होईल, त्यासाठी लागणारी स्टेण्ट मोफत उपलब्ध होईल यासाठी तरतूद करील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी महाआरोग्यशिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
खान्देश सेंट्रल मॉल येथे आयोजित या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाआरोग्यशिबिराचे आयोजक जंलसंपदामंत्री गिरीश महाजन, अथर्मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री डॉ.सावंत, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्य अल्पसंख्याक विकास आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसेे, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन, आमदार गुलाबराव पाटील, हरिभाऊ जावळे, डॉ.विजयकुमार गावीत, जयकुमार रावल, प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, उन्मेष पाटील, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, स्मिता वाघ, डॉ.गुरूमुख जगवानी, जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी, नाशिक जि.प.अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, सीईओ आस्तिककुमार पांडेय आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री आले गर्दीतून
मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री महाजन व इतर आमदार हे व्यासपीठासमोरील गर्दीतून आले. येत असताना त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत झाले. व्यासपीठावर आल्यावर जलसंपदामंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी उभे राहत सर्वांना अभिवादन केले.

पाणीपुरवठा मंत्र्यांना नव्हता रस्ता, सभापती, अध्यक्षपतींनाही नव्हती जागा
मुख्यमंत्री व्यासपीठावर आल्यानंतर समोर उपस्थित उठून उभे झाले. यात पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांना व्यासपीठापर्यंत गर्दीतून जाणे शक्य नव्हते. यामुळे ते व्यासपीच्या डाव्या बाजूला असलेल्या प्रसारमाध्यमांच्या बाजूने मंडापाच्या एका कोपर्‍यातून वाट काढत व्यासपीठावर पोहोचले. यातच जि.प.अध्यक्षांचे पती संतोष कोळी व जि.प.तील सभापती सुरेश धनके हे व्यासपीठाकडे पोहोचले. पण त्यांना बसायला जागा नव्हती. कोळी हे व्यासपीठावरच एका कोपर्‍यात उभे होते.

मुख्यमंत्री १.१६ ला व्यासपीठावर आले, सात मिनिटे भाषण केले
मुख्यमंत्री दुपारी १.१६ वाजता व्यासपीठावर आले. त्यांनी इतरांचे भाषण झाल्यावर सर्वात शेवटी जवळपास सात मिनिटे भाषण केले. २.५५ वाजता त्यांचे भाषण आटोपले. ३.४ वाजता मुख्यमंत्री व इतर मंत्री खान्देश सेंट्रल मॉलच्या आवारातून मार्गस्थ झाले.

Web Title: Healthy Information to Make Free for Angioplasty: GM Foundation and Blood Banking Agreement to Get Healthy Blood For Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.