Juices for thyroid: थायरॉईड उपचारासाठी 'हे' ज्युसेस ठरतील रामबाण! झटपट दूर होईल त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:56 PM2022-02-28T12:56:19+5:302022-02-28T12:56:31+5:30

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही ज्यूसचा (Juice) समावेश केल्यास ते आरोग्यासाठी चांगलं (Juice For Thyroid) ठरेल.

healthy juices for thyroid | Juices for thyroid: थायरॉईड उपचारासाठी 'हे' ज्युसेस ठरतील रामबाण! झटपट दूर होईल त्रास

Juices for thyroid: थायरॉईड उपचारासाठी 'हे' ज्युसेस ठरतील रामबाण! झटपट दूर होईल त्रास

Next

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत पौष्टिक आहार न घेतल्यानं आणि आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यानं मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित अनेक आजार मागे लागतात. थायरॉईड (Thyroid) ही देखील अशीच एक समस्या आहे. इतर आजारांच्या तुलनेत थायरॉईड झाल्यानंतर औषधांसोबतच आहाराकडे (Diet) अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. onlymyhealth नुसार, थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही ज्यूसचा (Juice) समावेश केल्यास ते आरोग्यासाठी चांगलं (Juice For Thyroid) ठरेल.

थायरॉईड ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, ज्यामुळं वजन झपाट्यानं वाढू लागते किंवा ते खूप कमी होऊ लागतं. अशा स्थितीत भूक तर लागतेच, पण पोटाशी संबंधित अनेक समस्याही दिसू लागतात. आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास थायरॉईडची समस्या नियंत्रित करता येते. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला अशा ज्यूसबद्दल सांगत आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही थायरॉइड नियंत्रित करू शकता.

जलकुंभी रस प्या
थायरॉईडमुळं वजन वाढत असलेल्या स्थितीवर नियंत्रणासाठी जलकुंभीचा रस रामबाण उपाय ठरू शकतो. हे करण्यासाठी, दोन कप जलकुंभीची पानं आणि २ सफरचंदं चांगली धुवा. आता ज्युसर ग्राइंडरमधून रस तयार करा आणि त्यात १ चमचा लिंबाचा रस मिसळा आणि सेवन करा. यामुळं थायरॉईडची समस्या कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमचे वजनही झपाट्यानं कमी होईल.

गाजर आणि बीटाचा रस ठरेल फायदेशीर
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी हे अतिशय प्रभावी ठरू शकतं. हा रस तयार करण्यासाठी, प्रत्येकी एक गाजर, बीट, अननस, सफरचंद आणि सेलरीची देठं घ्या. या सर्व गोष्टी नीट धुवून त्यांचे छोटे तुकडे करून रस तयार करा. या रसाचं नियमित सेवन केल्यास थायरॉईड नियंत्रणात राहतं. त्याचबरोबर हा रस शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करून रक्त वाढवण्यासही मदत करतो.

दुधी भोपळ्याचा रस आहे प्रभावी
हिरवी भाजी असण्यासोबतच दुधी थायरॉईडवरचाही एक उपाय आहे. रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्यानं थायरॉइड नियंत्रणात राहतं. हा रस एनर्जी बूस्टर (energy booster) म्हणून काम करतो आणि शरीरातील कमजोरीही कमी होते.

दुधीचा ज्यूस बनवण्यासाठी दुधीची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा. नंतर त्यात पुदिन्याची दहा पानं टाकून ज्यूस बनवा. आता त्यात थोडेसं काळे मीठ टाकून प्या.

 

Web Title: healthy juices for thyroid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.