Heart Attack: पोटदुखीही असू शकतो हार्ट अटॅकचा संकेत, जाणून घ्या ओळखण्याची पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 03:28 PM2022-07-13T15:28:06+5:302022-07-13T15:28:21+5:30
Signs Of Heart Attack: आजच्या काळात हृदयासंबंधी आजारांचं प्रमुख कारण खाणं-पिणं आमि जीवनशैली आहे. तेच हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर आणि स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या आता कमी वयातील लोकांमध्येही बघायला मिळत आहेत.
Signs Of Heart Attack: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि अंसतुलित खाण्या-पिण्यामुळे लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. आजच्या काळात हृदयासंबंधी आजारांचं प्रमुख कारण खाणं-पिणं आमि जीवनशैली आहे. तेच हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर आणि स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या आता कमी वयातील लोकांमध्येही बघायला मिळत आहेत.
तेच हार्ट अटॅकच्या समस्येत रूग्णाला छातीत वेदना, मानेत वेदना, श्वास भरून येणे अशा समस्या होतात. पण याशिवायही शरीरात हार्ट अटॅकचे वेगवेगळे संकेत दिसतात. ज्यांबाबत अनेकांना माहीत नसतं. पोटात दुखणं आणि गॅस या समस्या हृदयासंबंधी आजारांमुळे होतात. चला जाणून घेऊन पोटात वेदना कशाप्रकारे हार्ट अटॅकचा संकेत आहे.
पोटदुखी हार्ट अटॅकचा संकेत
सामान्यपणे हार्ट अटॅक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड क्लॉटिंगमुळे येतो. यामुळे हृदयाला योग्यप्रकारे रक्त पुरवठा होत नाही. अशात छातीत गंभीर वेदना होण्याची समस्या होते. पण अनेक रूग्णांमध्ये या समस्येदरम्यान पोटा दुखीची समस्याही बघण्यात आली. ही पोटदुखीची समस्या हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. जेव्हा हृदयापर्यंत रक्ताचा व्यवस्थित पुरवठा होत नाही तेव्हा यामुळे शरीरातही ब्लड सर्कुलेशन थांबतं. या स्थितीत पोटदुखीची समस्या होते. त्यामुळे पोटदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.
अपचन आणि ढेकर
हार्ट अटॅक येण्याआधी अपचन आणि ढेकर हे सुद्धा याचे संकेत मानले जातात. अपचन आणि ढेकरची समस्या पुन्हा होत असेल हार्ट अटॅक किंवा हार्टसंबंदी गंभीर समस्येचा संकेत असू शकतो. त्यामुळे अशी काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.