कधीही, कुठेही कोणत्याही वयात येतोय हार्ट अटॅक; 'या' चुका टाळा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:17 PM2023-02-28T16:17:32+5:302023-02-28T16:18:09+5:30

गेल्या काही महिन्यात डान्स करताना, व्यायाम करताना, किंवा सामान्य कामे करताना कार्डियाक अरेस्टच्या घटना वाढल्या आहेत.

Heart Attack, Anytime, Anywhere Any Age Heart Attack; Avoid 'these' mistakes, otherwise | कधीही, कुठेही कोणत्याही वयात येतोय हार्ट अटॅक; 'या' चुका टाळा, अन्यथा...

कधीही, कुठेही कोणत्याही वयात येतोय हार्ट अटॅक; 'या' चुका टाळा, अन्यथा...

googlenewsNext


गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्यामुळे(कार्डियाक अरेस्ट) मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हृदयविकाराच्या झटक्याने अचानक प्राण गमावलेल्यांपैकी बहुतेक लोक तरुण होते. नुकताच एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. यामुळे आजकाल 20-40 वयोगटातील लोकांना आपल्या तब्येतीची भीती वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत कार्डियाक अरेस्ट आल्यावर काय करावे, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

कार्डियाक अरेस्टमध्ये जीव वाचणे कठीण
अचानक कार्डियाक डेथमध्ये हृदयाशी संबंधीत सर्व गोष्टी अचानक थांबतात. श्वास घेणे किंवा रक्त प्रवाह थांबल्यामुळे काही मिनिटात त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. या परिस्थितीत त्याला रुग्णालयापर्यंतही नेता येत नाही. पण, कार्डियाक अरेस्ट आल्यानंतर तात्काळ सीपीआर दिला, तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. सामान्य हार्ट अटॅकमध्ये हृदयाक गाठ तयार झाल्यामुळे रक्तप्रवाह थांबतो. यात रुग्णाला याची जाणीव होते आणि थोडा वेळही असतो .पण, कार्डियाक अरेस्टमध्ये तात्काळ हृदय काम करणे बंद होते.

तरुणांमध्ये जास्त धोका
सडन कार्डियाक अरेस्ट किंवा सडन कार्डियाक डेथ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. यातील बहुतेक प्रकरणं अॅथलीट्स किंवा अंग मेहनत करणाऱ्यांमध्ये दिसून येत आहेत. डॉक्टर्स सांगतात की, सडन कार्डियाक डेथमुळे हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिग्नलिंगमध्ये गडबड होते. जेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, तेव्हा हृदयाचे खालील चेंबर रक्ताला पंप करण्याऐवजी फडफड करतो. यामुळे हृदयावर ताण पडतो आणि टिश्यूज डॅमेज होतात. यामुळे त्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू होतो.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
जर तुमच्या हृदयाचे ठोके जास्त असतील, किंवा काम-व्यायाम करताना चक्कर येत असेल, तर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार आहे. याशिवाय, पायऱ्या चढताना स्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा खूप घाम येत असेल, अशा परिस्थितीत तुम्हाला हार्ट प्रॉब्लम असू शकतो. ही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 

Web Title: Heart Attack, Anytime, Anywhere Any Age Heart Attack; Avoid 'these' mistakes, otherwise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.