बाथरूममधील 'या' 4 सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका; अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:14 AM2019-08-29T11:14:55+5:302019-08-29T11:19:38+5:30

आपण शरीराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज आंघोळ करतो. तसेच आंघोळ केल्यानंतर थकवा दूर आणि मूड फ्रेश होतो. आंघोळीसाठी आपण थंड किंवा गरम पाण्याचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का?

Heart attack cardiac arrest stroke causes in bathroom risk factors prevention tips treatment | बाथरूममधील 'या' 4 सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका; अशी घ्या काळजी!

बाथरूममधील 'या' 4 सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका; अशी घ्या काळजी!

googlenewsNext

आपण शरीराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज आंघोळ करतो. तसेच आंघोळ केल्यानंतर थकवा दूर आणि मूड फ्रेश होतो. आंघोळीसाठी आपण थंड किंवा गरम पाण्याचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे हे वेगवेगळे आहेत. एवढचं नाहीतर आंघोळ करण्याचे जसे फायदे आहेत तसेच आंघोळ करण्याचे काही तोटेही आहेत. कारण आंघोळ करण्याचे काही नियम आहेत, जे आपल्या शरीरावर वेगवेगळ्या स्वरूपात परिणाम करतात. 

तुम्ही नोटिस केलं असेल की, बाथरूममध्ये आंघोळ करताना हार्ट अटॅकचा धोका अधिक होतो. संशोधकांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, थंडीपेक्षा आंघोळ करताना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका 10 टक्क्यांनी वाढतो. तुम्हाला माहित आहे का? बाथरूममध्ये हार्ट अटॅकचा धोका अधिक असण्यामागे काय कारणं असू शकतात?

आज आपण हार्ट अटॅक येण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या काही कारणांबाबत सविस्तर जाणून घेऊया...
 
lokmatnews.in यांनी दिलेल्या वृत्तानुसार, बाथरूममध्ये हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणं आहेत. आंघोळ करताना अनेकदा शरीराचं तापमान अचानक बदलतं. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि त्याचा परिणाम हृदयावर होतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हृदयाच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रूग्णांसाठी हॉट बाथ अत्यंत धोकादायक ठरतं. कारण यामुळे अचानक ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका असतो. 

अमेरिकेतील न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशिक झालेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, डायबिटीसच्या रूग्णांनी अर्धा तास हॉट बाथ घेतल्याने त्यांची ब्लड शुगर जवळपास 13 टक्क्यांनी कमी होतं. 

1. आंघोळ करताना ब्लड प्रेशर वाढतं किंवा कमी होतं. पण ते त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. अचानक गरम पाणी किंवा थंड पाणी शरीरावर पडल्याने ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त होऊ शकतं. 

2. अनेकदा लोकं आंघोळ करतना शरीर स्वच्छ करण्यासाठी जास्त जोर लावतात. असं केल्याने शरीराच्या नसांवर दबाव येतो.  

3. आंघोळीदरम्यान पायांच्या आधारे जास्त वेळ बसल्याने नसांमधील ब्लड फ्लो प्रभावित होतो. जे ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त होण्याचं एक कारण आहे. 

4. काही लोक आंघोळ करताना फार गडबड करतात. तसेच बाथटबमध्ये जास्त वेळ बसून राहतात. असं केल्याने ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. 

ही काही अशी कामं आहेत. जी केल्यामुळे थेट हार्ट रेटवर परिणाम होतो. ज्यामुळे ब्लड फ्लो प्रभावित होतो आणि धमन्यांवर दबाव वाढतो. याच कारणामुळे बाथरूममध्ये आंघोळ करताना हार्ट अटॅक किंवा कार्डिअॅक अरेस्ट या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आंघोळ करताना सर्वात आधी तळव्यांवर पाणी ओतावं. त्यानंतरच डोकं आणि शरीराच्या इतर अवयवांवर पाणी ओतावं. थेट डोक्यावर थंड पाणी टाकल्याने ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. ज्यामुळे हृदयाचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Heart attack cardiac arrest stroke causes in bathroom risk factors prevention tips treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.