या लोकांनी अचानक डान्स करणं टाळावं, नाही तर हार्ट अटॅकने जाऊ शकतो जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 14:13 IST2022-09-07T14:13:16+5:302022-09-07T14:13:35+5:30
Dance Cause Heart Attack: ज्या डान्सला लोक आरोग्यासाठी चांगलं मानतात त्यानेही जीव जाऊ शकतो. या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी हाय इंटेशन असलेला डान्स करण्यापासून स्वत:ला रोखलं पाहिजे.

या लोकांनी अचानक डान्स करणं टाळावं, नाही तर हार्ट अटॅकने जाऊ शकतो जीव!
Dance Cause Heart Attack: डान्स आरोग्यासाठी चांगला मानला जातो. बरेच लोक डान्स करून वजन कमी केल्याचा दावा करतात. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती डान्स करता करता खाली पडतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. नंतर समजलं की, त्याचा मृत्यू झाला कारण डान्स करताना त्याला हार्ट अटॅक आला होता. पण तुम्ही कधी विचार केला नसेल की, ज्या डान्सला लोक आरोग्यासाठी चांगलं मानतात त्यानेही जीव जाऊ शकतो. या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी हाय इंटेशन असलेला डान्स करण्यापासून स्वत:ला रोखलं पाहिजे.
काय सांगतात एक्सपर्ट?
डान्सबाबत एक्सपर्ट सांगतात की, डान्स करणं आरोग्यासाठी चांगलं आहे. पण जर तुम्ही रोज डान्स करत नसाल तर अचानक जोरात डान्स करण्यापासून वाचलं पाहिजे. कारण अचानक जोरात डान्स केल्याने हार्ट रेट वाढतो. यामुळे हार्टवर जास्त प्रेशर पडतं. जर एखादी व्यक्ती लठ्ठपणा किंवा हायपरटेंशनने ग्रस्त असेल तर अचानक जोरात डान्स करणं टाळावं. नाही तर कार्डियाक अरेस्टचा धोका असतो आणि तुमचा जीवही जाऊ शकतो.
या कारणाने अचानक डान्स करणं धोकादायक
ज्या लोकांना हृदयरोगांची समस्या असेल तर त्यांनी अचानक डान्स करणं टाळलं पाहिजे. डॉक्टरांचं मत आहे की, ज्या लोकांना आर्टिरीज ब्लॉकची समस्या आहे त्यांनी हेवी एक्सरसाइज अजिबात करू नये. जास्त स्मोकिंग करणाऱ्या लोकांनीही हेवी एक्सरसाइज आणि हाय इंटेशन असलेला डान्स करू नये. ज्यांना आधीच हार्ट अटॅक येऊन गेला त्यांनी हलका डान्स करावा. तसेच कमी वेळासाठी करावा.