Heart Attack : आता ३ वर्षाआधीच कळेल हार्ट अटॅकचा धोका, समोर आली जबरदस्त पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:28 PM2022-02-24T13:28:46+5:302022-02-24T13:29:36+5:30

Heart Attack : अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रीव्हेंशनने हार्ट अटॅकची अनेक लक्षणं सांगितली यात छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवणे हे दोन सर्वात महत्वाचे आहेत.

Heart Attack : danger of heart attack could be detected 3-years ahead says study | Heart Attack : आता ३ वर्षाआधीच कळेल हार्ट अटॅकचा धोका, समोर आली जबरदस्त पद्धत!

Heart Attack : आता ३ वर्षाआधीच कळेल हार्ट अटॅकचा धोका, समोर आली जबरदस्त पद्धत!

Next

भारतात हृदयरोगाने (Heart Disease) पीडित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनहेल्दी लाइफस्टाईल आणि तेलयुक्त पदार्थ खाल्ल्याने तरूणांनाही हार्ट डिजीजने मोठ्या प्रमाणात प्रभावित केलं आहे. पण हा धोका तुम्ही आधीच ओळखू शकता. आता वैज्ञानिकांनी एक अशी पद्धत शोधून काढली ज्याच्या माध्यमातून साधारण ३ वर्षाआधी हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका ओळखू शकता. ही एक अशी टेस्ट आहे ज्याने हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा धोका बराच कमी होऊ शकतो.

रिसर्चमधून मोठा खुलासा 

वैज्ञानिकांनी हार्ट अटॅकच्या जुन्या रूग्णांचे सी-रिअ‍ॅक्टिव प्रोटीनची टेस्ट केली. याने इन्फेमेशनची माहिती घेतली जाते. सोबतच ट्रोपोनिनचीही स्टॅंडर्ड टेस्ट केली गेली. ट्रोपोनिन असं खास प्रोटीन आहे जे हदय डॅमेज झाल्यावर रक्तातून निघतं. रिसर्चनुसार, अडीच लाख रूग्णामध्ये ज्यांची सीआरपी लेव्हल जास्त होती आणि ट्रोपोनिन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, त्यांना ३ वर्षात मृत्यूचा धोका साधारण ३५ टक्के होता.

लाखो लोकांचा वाचेल जीव

वैज्ञानिकांनुसार, योग्य वेळी जर मॉनिटरिंग केली गेली आणि अ‍ॅंटी-इफ्लेमेटरीज औषधांचं सेवन केलं गेलं असेल तर लाखो लोकांचा मृत्यू होण्यापासून वाचवलं जाऊ शकतं. इंपीरिअल कॉलेज ऑफ लंडनचे डॉ. रमजी खमीज यांनी सांगितलं की, या टेस्टचा शोध अशा वेळी लागला जेव्हा दुसऱ्या टेस्टने जास्त कमजोर लोकांमध्ये याच्या धोक्याची शक्यता जाणून घेतली जात आहे.

४३ टक्के कमी होऊ शकतो धोका

या रिसर्चसाठ फंड देणाऱ्य ब्रिटीश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर जेम्स लीपर म्हणाले की, 'हा डॉक्टरांच्या मेडिकल किटमध्ये सामिल होणारं एक बहुमूल्य टूल आहे'. एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, दिवसातून साधारण ४ तास स्वत:ला अ‍ॅक्टिव ठेवल्याने हृदयरोगाचा धोका ४३ टक्के कमी होऊ शकतो.

हार्ट अटॅकची लक्षणं कशी ओळखाल?

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रीव्हेंशनने हार्ट अटॅकची अनेक लक्षणं सांगितली यात छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवणे हे दोन सर्वात महत्वाचे आहेत. कमजोरी, घसा, कंबर किंवा जबडा दुखणे हेही गंभीर आजाराकडे इशारा करतात. जर तुम्हाला अस्वस्थता जाणवत असेल किंवा खांदा दुखत असेल तर वेळीच सावध व्हा.

 

Web Title: Heart Attack : danger of heart attack could be detected 3-years ahead says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.