Heart Attack : दुर्लक्ष करु नका अशा दुखण्याकडे !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 10:04 AM2017-05-19T10:04:53+5:302017-05-19T15:34:53+5:30
हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यापैकी सुमारे एक तृतीयांश रुग्णांना माहित नसते की, त्यांना ह्रदय विकार आहे आणि हॉस्पिटल पोहचण्याअगोदरच त्यांचा मृत्यू होतो.
Next
हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यापैकी सुमारे एक तृतीयांश रुग्णांना माहित नसते की, त्यांना ह्रदय विकार आहे आणि हॉस्पिटल पोहचण्याअगोदरच त्यांचा मृत्यू होतो. याला जबाबदार सर्वात मोठे कारण म्हणजे पहिल्यांदा आलेल्या हार्ट अटॅकला आपण ओळखूच शकलो नाही. अशा हार्ट अटॅकचे लक्षणे अस्पष्ट असतात म्हणून आपण ओळखू शकत नाही, यालाच सायलेंट हार्ट अटॅकदेखील म्हणतात.
काय आहेत सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे :
* छातीत अस्वस्थता
छातीत अस्वस्थता वाटणे हार्ट अटॅकचे पहिले संभाव्य लक्षण आहे. यादरम्यान अस्वस्थता किं वा दुखण्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय छातीच्या मध्यस्थानी काही मिनिटांपर्यंत दबाव किंवा घट्टपणादेखील वाटू शकते.
* घाम येणे
या परिस्थितीत आपणास विनाकारण खूपच घाम येऊ शकतो. सोबतच आपणास थंडीदेखील वाटू लागेल. आपली त्वचा स्टिकी होऊ शकते. शिवाय आपणास ओमेटींग होण्यासारखेही वाटू शकते.
* श्वास घेण्यास अडथळा
आपणास या दरम्यान श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, सोबतच आपण लांब श्वास घेण्याचा प्रयत्न करु लागतात. ही परिस्थिती विशेषत: छातीत अस्वस्थता होण्याअगोदर होऊ शक ते. कदाचित आपल्या छातीत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली आपणास समजणारही नाही.
* शरीराच्या वरील भागात दुखणे
दुखणे आणि अस्वस्थताची ही परिस्थिती छातीपासून आपले खांदे, बाहु, कंबर, मान, दात किंवा हिरड्यांपर्यंत पोहचू शकते. एवढेच नव्हे तर आपल्या शरीराच्या वरच्या भागात हे दुखणे विना अस्वस्थताचेही होऊ शकते.
* या कारणाने येतो हार्ट अटॅक
ह्रदयापर्यंत रक्त पोहचविणाऱ्या नसांमध्ये गुठळ्या तयार झाल्यास ह्रदयापर्यंत रक्त प्रवाह सुरळीत होऊ शकत नाही. रक्त न मिळाल्यामुळे ह्रदयाच्या मांशपेशींमध्ये आॅक्सिजनची कमतरता भासते. जर लवकर रक्ताचा प्रवाह सुरळीत झाला नाही तर ह्रदयाच्या मांशपेशींची गती थांबते. बहुतांश हार्ट अटॅकमध्ये मृत्यू गुठळ्या फुटल्याने होते.
Also Read : रिमा लागू: धोकेदायक "कार्डियक अरेस्ट" ने झाला मृत्यु, ही आहेत लक्षणे !