सावधान! अचानक छातीत दुखतं अन्...; जिममध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्यामागे 'हे' आहे 'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:16 AM2023-02-27T10:16:02+5:302023-02-27T10:21:14+5:30
Heart Attack : गेल्या वर्षी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
आजची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना 24 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूचे धक्कादायक क्षण जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की तरुणाने आधी पुश-अप केले आणि स्ट्रेच करताना खाली पडला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
वर्कआउट सत्रादरम्यान एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या घटनेने गेल्या काही महिन्यांत देशाने पाहिलेल्या अशाच काही घटनांची आठवण करून दिली. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. याशिवाय साऊथ सुपरस्टार पुनेश राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर 2021 रोजी वर्कआउट दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही यादी दिवसेंदिवस वाढत आहे.
Watch CCTV Footage 👇
— Arbaaz The Great (@ArbaazTheGreat1) February 23, 2023
He died at gym due to heart attack. pic.twitter.com/FbA6hghS4E
व्यायामशाळेत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते जेव्हा व्यायाम अधिक तीव्र आणि गुंतागुंतीचा असतो. खाली काही कारणे दिली आहेत, जी जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरू शकतात.
जास्त वजन
बॅक प्रेस, स्क्वॉट्स, लंग जंप इत्यादी सारखे जड व्यायाम मुख्य स्नायूंना घट्ट करतात ज्यामुळे हृदयाला अधिक काम करण्यास भाग पाडले जाते. म्हणूनच व्यायाम करताना वजन हाताळताना काळजी घेणे आवश्यक आहे.
अधिक इंटेन्सिटी
व्यायामशाळेत इंटरव्हल ट्रेनिंग, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग इत्यादी जटिल व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
खूप व्यायाम
जास्त व्यायाम करणे देखील हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. अनेक व्यायाम करताना जास्त ऑक्सिजन लागतो ज्यामुळे हृदयाचे ठोके जलद होतात. जास्त व्यायामामुळे हृदयाची मागणी पूर्ण होत नाही त्यामुळे हृदयाच्या अवयवाला ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे हृदयाच्या कामात विलंब होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
अधिक ताण
जिममध्ये गेल्यावर थकवा येतो आणि त्यानंतर तणाव निर्माण होऊ शकतो. अतिरिक्त ताण हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो, ज्यामुळे हृदयाच्या कार्यास विलंब होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"