'या' वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त, लक्षणांची माहिती वेळीच घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 02:25 PM2022-09-08T14:25:57+5:302022-09-08T14:27:59+5:30

अ‍ॅटॅकमध्ये रक्तप्रवाह (Blood Flow) खंडित होतो आणि त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहचू शकत नाही. महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकची समस्या झपाट्यानं वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, 18 ते 55 वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.

heart attack in women causes symptoms and remedies | 'या' वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त, लक्षणांची माहिती वेळीच घ्या जाणून

'या' वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त, लक्षणांची माहिती वेळीच घ्या जाणून

googlenewsNext

रोजचा तणाव आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे हृदयाशी (Heart) संबंधित अनेक समस्या उद्भवतात. हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack) येण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरतात. हार्ट अ‍ॅटॅकमध्ये रक्तप्रवाह (Blood Flow) खंडित होतो आणि त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहचू शकत नाही. महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकची समस्या झपाट्यानं वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, 18 ते 55 वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.

महिलांच्या शरीरात हृदयविकार (Heart Disease) आणि हार्ट अ‍ॅटॅकची पूर्वलक्षणं दिसून येतात. अशा परिस्थितीत ती लक्षणं समजून घेत हार्ट अ‍ॅटॅकचा धोका टाळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकच्या अनुषंगाने काही जोखमीचे घटक आणि लक्षणं दिसून येतात, या विषयी जाणून घेऊया.

हाय कोलेस्टेरॉल : हेल्थलाइन डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, इस्ट्रोजेन (Estrogen) हा हॉर्मोन महिलांचं हाय कोलेस्टेरॉलपासून (High cholesterol) संरक्षण करतो. परंतु, मेनोपॉजनंतर याचं प्रमाण कमी होतं आणि कोलेस्टेरॉल वाढतं. कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढल्यास हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो.

हाय ब्लड प्रेशर : महिलांमध्ये प्रेग्नसीदरम्यान ब्लड प्रेशर (Blood Pressure) अर्थात रक्तदाब वाढणं ही सर्वसामान्य बाब आहे. पण हीच गोष्ट हार्ट अ‍ॅटॅकसाठी कारणीभूत ठरू शकते. याशिवाय महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास त्याचा हृदयावर नकारात्मक परिणाम होतो.

मानसिक समस्या : महिलांमध्ये स्ट्रेस, डिप्रेशन आणि एन्झायटी या समस्यादेखील हार्ट अ‍ॅटॅकसाठी कारणीभूत ठरतात. याशिवाय अन्य काही मानसिक आजारांमुळे (Psychological Disease) हृदयावर परिणाम होऊ शकतो.

कॅन्सर किंवा किडनी फेल्युअर : लठ्ठपणा (Obesity) आणि डायबेटिस (Diabetes) या समस्या सध्याच्या काळात सर्वसामान्य आहेत. पण या समस्या हार्ट अ‍ॅटॅकचं प्रमुख कारणही आहेत. त्यातच कॅन्सर किंवा किडनी फेल्युअरमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढू शकतो.

महिलांमध्ये दिसणारी हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं
हाडे दुखणं (Bone Pain) : महिलांना हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर सर्वप्रथम मान, पाठ आणि कंबरेत वेदना जाणवतात. तसंच हात, पाय आणि खांदेदुखीचा त्रास होतो.

छातीत दुखणं (Chest Pain): छातीत दुखणं आणि अस्वस्थ वाटणं ही हार्ट अ‍ॅटॅकची प्राथमिक लक्षणं आहेत. या वेदना कमी किंवा जास्त प्रमाणात जाणवू शकता. या वेदना होत असताना दबाव असल्यासारखं आणि टोचल्यासारखं वाटतं.

चक्कर येणं आणि अशक्तपणा : महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येण्यापूर्वी मळमळ आणि उलट्यांची समस्या दिसून येते. तसंच डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं आणि चक्कर येणं या समस्या दिसून येतात.

असामान्य हार्ट रेट : हार्ट अ‍ॅटॅक येण्यापूर्वी हृदय व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे हार्ट रेट (Heart Rate) जास्त किंवा कमी होतो. यामुळे अनेकदा चिंताग्रस्त होणं, एन्झायटी आणि पोटदुखीसारखी लक्षणं दिसून येतात.

Web Title: heart attack in women causes symptoms and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.