सावधान! ‘या’ 2 कारणांमुळे तरुणांमध्ये वाढले हार्ट अटॅकचे प्रमाण; ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 04:34 PM2023-04-06T16:34:16+5:302023-04-06T16:39:26+5:30
Heart Attack : गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वेगाने वाढले आहे.
हार्ट अटॅक हे जगभरातील सर्वाधिक मृत्यूचे कारण आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी जगभरात 1 कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू हा हृदयासंबंधित आजाराने होतो. पूर्वी ही समस्या वृद्धांमध्ये दिसून येत होती, परंतु गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वेगाने वाढले आहे. खराब जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव ही यामागची दोन मोठी कारणे आहेत. याशिवाय कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड, धुम्रपान, वजन, दारूचे सेवन आणि तणाव अशा अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येतो.
हार्ट अटॅक मागे अनेक कारणे असू शकतात, परंतु सर्वात सामान्य कारण म्हणजे नियमित आहार न घेणे आणि जास्त वजन असणे. हार्ट अटॅक धमनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे होतो ज्याचा परिणाम धमनीच्या ब्लॉकेजमुळे होतो. याशिवाय सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, अति ताण आणि चिंता, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा कौटुंबिक इतिहासही कारणीभूत आहे.
हार्ट अटॅकची लक्षणं
पुरुष आणि स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचे लक्षणे वेगवेगळी असू शकतात.
- छातीवर दबाव जाणवणं
- छातीत दुखणे
- थकवा
- ताप
- मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे
अशी घ्या आरोग्याची काळजी
सकस आहार : सकस आहार घेणे फार महत्वाचे आहे. चरबीयुक्त आणि तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. व्यक्तींनी नियमितपणे फळे आणि भाज्या खाव्यात ज्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात.
व्यायाम : नियमित व्यायाम हार्ट अटॅक टाळण्यासही उपयुक्त ठरतो. दररोज 30-40 मिनिटे व्यायाम सुरू करा.
धूम्रपान आणि मद्यपानापासून अंतर - धूम्रपान आणि मद्यपानामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यापासून लांब राहा.
तणाव कमी करा - तणावामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तणाव कमी करण्यासाठी योगा आणि मेडिटेशनचा अभ्यास करा.
नियमित तपासणी - नियमित तपासणी करणे देखील हार्ट अटॅक टाळण्यास उपयुक्त आहे. तुमच्या डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या आणि लक्षणं ओळखा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"