खाण्या-पिण्याची या एका छोट्या सवयीमुळे हार्ट अटॅकचा धोका होतो कमी, वेळीच करा बदल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:43 PM2022-04-11T18:43:01+5:302022-04-11T18:43:43+5:30

Heart Health : सोडिअम म्हणजे कमी मीठ असलेल्या आहाराने हार्ट फेलची समस्या असणाऱ्या लोकांच्या जीवनात सुधारणा होते. पण हॉस्पिटलायजेशनची समस्या कमी होत नाही.

Heart attack risk low salt diet can prevent heart failure surprising findings | खाण्या-पिण्याची या एका छोट्या सवयीमुळे हार्ट अटॅकचा धोका होतो कमी, वेळीच करा बदल...

खाण्या-पिण्याची या एका छोट्या सवयीमुळे हार्ट अटॅकचा धोका होतो कमी, वेळीच करा बदल...

googlenewsNext

Heart Health : आहारात मिठाचं प्रमाण जास्त असण्याचं हृदयरोगासोबत थेट कनेक्शन आहे. डॉक्टर नेहमीच मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात. जेणेकरून हृदयरोगांपासून बचाव व्हावा. यावर अजूनही शोध सुरू आहे की, सोडिअमचं कमी प्रमाण हॉस्पिटलमध्ये होण्यापासून किंवा इमरजन्सीमधून कसं वाचवतं. 'द लॅंसेट'मध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये आढळून आलं की, सोडिअम म्हणजे कमी मीठ असलेल्या आहाराने हार्ट फेलची समस्या असणाऱ्या लोकांच्या जीवनात सुधारणा होते. पण हॉस्पिटलायजेशनची समस्या कमी होत नाही.

रिसर्चमध्ये आढळून आलं की, सोडिअमचं प्रमाण कमी केल्याने हार्ट फेलिअर असणाऱ्या लोकांना फायदा होतो. ८०० लोकांचा सहभाग असलेल्या या रिसर्चमध्ये दोन टिम करण्यात आल्या होत्या. या सर्वच लोकांना क्रोनिक हार्ट फेलिअरची समस्या हती. यातील एका टिमला काही दिवस कमी सोडिअम असलेला आहार देण्यात आला. तेच दुसऱ्या टिमला थोडं सोडिअम वाढवून आहार दिला. त्यांच्यावर १२ महिने लक्ष ठेवण्यात आलं.

वैज्ञानिकांना आढळलं की, कमी सोडिअम डाएटमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची संख्या कमी झाली नाही, पण त्यांच्या जीवनात सुधारणा झाली. सोडिअमचं प्रमाण कमी करण्याचा प्रभाव जास्त काळापर्यंत दिसतो. वैज्ञानिकांनी सल्ला दिला की, केवळ सोडिअमचं प्रमाण कमी करून हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची शक्यता कमी केली जाऊ शकते. त्यामुळे हृदयरोगींनी दुसऱ्या मेडिकल ट्रिटमेंट सुरू ठेवाव्या. 

हार्ट फेलिअरची लक्षणं 

हार्ट फेलिअर तेव्हा होतं जेव्हा हृदयाच्या मागणीनुसार प्रभावीपणे ते रक्त पंप करू शकत नाही. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व आणि ऑक्सीजन मिळू शकत नाही. हार्ट फेलिअर एक क्राॉनिक आजार आहे. याची काही खास लक्षणे असतात.

१) खोकल्याचा त्रास, सतत खोकला आणि अस्वस्थता

२) अतिरिक्त तरल पदार्थांमुळे सूज

३) फार जास्त थकवा जाणवणे

४) हृदयाचे ठोके वाढणे

एक्सपर्ट नेहमीच हार्ट फेलिअरची समस्या असणाऱ्यांना कमी मीठ खाण्याचा सल्ला देताता. यामागे हे कारण आहे की, सोडिअमचं प्रमाण कमी केल्याने हार्ट फेलिअरवाल्यांमध्ये जास्त फ्लूड तयार होणं रोखलं जातं. डॉक्टरांनुसार, जर मीठ जास्त खाल्लं तर फ्लूडचं प्रमाण वाढलं आणि त्याने हार्ट फेलचा धोका होऊ शकतो. 
 

Web Title: Heart attack risk low salt diet can prevent heart failure surprising findings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.