Heart Attack: या आयुर्वेदिक उपायाने कमी करू शकता हार्ट अटॅचा धोका, जाणून घ्या पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:17 PM2022-06-07T15:17:41+5:302022-06-07T15:18:04+5:30
Heart Attack: कडुलिंबाच्या पानाचं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकता. म्हणजे तुम्ही थेट खाऊ शकता किंवा तुम्ही पाण्यासोबत सेवन करू शकता. याने तुम्हाला नक्कीच अनेक फायदे मिळतील.
Heart Attack: अलिकडे हार्टचा धोका अलिकडे कमी वयातही जाणवतो. त्याला जबाबदार आहे आजकालची बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी. मात्र, हार्ट अटॅक टाळण्यासाठी अनेक उपाय आहेत जे फॉलो केले तर तुम्ही यापासून बचाव करू शकाल. एक आयुर्वेदातील उपाय म्हणजे कडुलिंबाची पाने. तुम्ही हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. चला जाणून घेऊन याच्या सेवनाची पद्धत.
कडुलिंबाच्या पानाचं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकता. म्हणजे तुम्ही थेट खाऊ शकता किंवा तुम्ही पाण्यासोबत सेवन करू शकता. याने तुम्हाला नक्कीच अनेक फायदे मिळतील.
कडुलिंबाच्या पानाचे फायदे
कडुलिंबाच्या पानांचा वापर कुष्ठ रोग्यांसाठीही केला जातो. तसेच याचा वापर डोळ्यांची दृष्टी चांगली करण्यासाठीही केला जातो. तसेच दातांच्या किडीसाठी, पोट खराब असेल तर, भूक लागत नसेल तर आणि त्वचेवर अल्सरची समस्या दूर करण्यासाठी या पानांचा वापर केला जातो.
पानांची वापर करण्याची पद्धत
- तुम्ही कडुलिंबाची पाने उकडून ते पाणी पिऊ शकता. तसेच तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा चहा सुद्धा घेऊ शकता. अर्थातच ही पाने कडू लागतात. यापासून मिळणारे फायदे दिसायला लागले तर याचा तुम्ही नेहमीच डाएटमध्ये समावेश कराल.
- त्यासोबतच ज्या लोकांना त्वचेसंबंधी समस्या आहे ते सुद्धा कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. कडुलिंबाची पाने तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून याने आंघोळही करू शकला. याने त्वचेसंबंधी समस्या आणि त्वचेवरील अॅलर्जी दूर होईल.
(टिप : वरील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. यांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)