हार्ट अटॅक येण्याआधी कानात दिसू शकतो हा संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 02:47 PM2024-10-02T14:47:05+5:302024-10-02T14:48:30+5:30
Heart Attack Sign : हार्ट अटॅक दरम्यान रक्ताच्या गाठी तयार झाल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच रक्ताच्या या गाठी कानांपर्यंत पोहोचू शकतात.
Heart Attack Sign : भारतात डायबिटीससोबतच दिवसेंदिवस वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका खूप जास्त वाढत आहे. माहितीचा अभाव असल्याने बरेच लोक हृदयरोगांच्या अनेक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. हृदयरोगांची तर शरीरात अनेक लक्षण दिसतात. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, कानात वेदना आणि जडपणा हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. हा धक्कादायक खुलासा नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशन (NCBI) द्वारे प्रकाशित रिसर्चमधून करण्यात आला आहे.
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, हार्ट अटॅक दरम्यान रक्ताच्या गाठी तयार झाल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच रक्ताच्या या गाठी कानांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे कानात वेदना, जडपणा किंवा कमी ऐकू येणे अशा समस्या होतात.
५०० रूग्णांवर शोध
अभ्यासकांनी ५०० पेक्षा जास्त हृदयरोग असलेल्या रूग्णांवर रिसर्च केला. यात त्यांना आढळलं की, ज्या रूग्णांना हार्ट अटॅक आला होता, त्यांच्यापैकी १२ टक्के रूग्णांनी कानाशी संबंधित समस्या होती. यातील अनेकांना कानात वेदना झाल्या. तर काही लोकांना जडपणा आणि ऐकण्याची समस्या झाली होती.
एक्सपर्ट्सचा सल्ला
हृदयरोगासंबंधी या रिसर्चचे मुख्य डॉ. डेविड मिलर यांच्यानुसार, कानात जडपणा किंवा वेदना हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. कोणत्याही कारणाशिवाय कानात वेदना होत असेल किंवा जडपणा वाटत असेल तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. अशात वेळीच डॉक्टरांना संपर्क करावा. ते असंही म्हणाले की, कानात वेदना किंवा जडपणा हार्ट अटॅकचा एकमेव संकेत नाही. हे कानात इन्फेक्शन, सायनस किंवा मायग्रेनसारख्या इतर समस्यांचं देखील लक्षण असू शकतं. त्यामुळे योग्य कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या रिसर्चमधून अशीही बाब समोर आली की, अनेकदा हार्ट अटॅकची कॉमन लक्षणं जसे की, छातीत वेदना किंवा श्वास घेण्यास समस्या हे दिसत नाहीत. अशात कानात वेदना आणि जडपणा यांसारख्या लक्षणाकडे लक्ष देण्याची गरज पडते. खासकरून वयोवृद्ध आणि डायबिटीसच्या रूग्णांमध्ये हार्ट अटॅकचा हा संकेत दिसू शकतो.