तुमचं शरीर एका महिन्याआधीच देत हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच ओळखलात तर टळू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:54 PM2022-05-05T17:54:27+5:302022-05-05T17:56:37+5:30

खरं तर हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी तुमच्या शरीरात काही विशेष बदल घडायला लागतात. हे बदल जर तुम्ही ओळखलेत, तर त्यावर योग्य तो उपचार आधीच करुन तुम्ही हृदयविकाराचा झटका येण्यापासून स्वत:ला किंवा इतरांना वाचवू शकता. आता ती लक्षणे कोणती आणि ती कशी ओळखायाची याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

heart attack symptoms before one month | तुमचं शरीर एका महिन्याआधीच देत हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच ओळखलात तर टळू शकतो धोका

तुमचं शरीर एका महिन्याआधीच देत हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच ओळखलात तर टळू शकतो धोका

googlenewsNext

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर अनेक संकेत देते. त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. कारण तुम्हाला जर याचे संकेत आधीच कळते तर, तुम्ही यामुळे पुढे भविष्यात होणारा धोका टाळू शकता. तसे पाहाता हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये सारखीच असतात, परंतु महिलांमध्ये ही लक्षणे ओळखणे पुरुषांपेक्षा अधिक कठीण असते. आजच्या काळात अशी परिस्थिती आहे की, २४ वर्षांच्या तरुणांनाही हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागत आहे.

हृदयविकाराचा झटका कोणालाही कुठेही आणि कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत तो प्रत्येक वेळी तो टाळता येईलच असे नाही. काही लोकांना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे, परंतु असे अनेक लोक आहेत, ज्यांनी यामुळे आपले प्राण देखील गमवले आहेत.

खरं तर हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी तुमच्या शरीरात काही विशेष बदल घडायला लागतात. हे बदल जर तुम्ही ओळखलेत, तर त्यावर योग्य तो उपचार आधीच करुन तुम्ही हृदयविकाराचा झटका येण्यापासून स्वत:ला किंवा इतरांना वाचवू शकता. आता ती लक्षणे कोणती आणि ती कशी ओळखायाची याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- छातीत जळजळ होण्याची समस्या आहे, ज्याकडे लोक आम्लपित्त म्हणून दुर्लक्ष करतात.
- धाप लागणे किंवा कधीकधी श्वास घेण्यात अडचण येणे
- खूप लवकर थकवा. कोणत्याही गोष्टी उचलताना किंवा अंथरुणातून उठताना थकवा येणे
- चक्कर येणे
- अनियंत्रित रक्तदाब
- छाती दुखणे
- मळमळ
- अनियंत्रितपणे छातीत धडधडणे

यांशिवाय छातीत घट्टपणा जाणवणे, अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे. ही काही सामान्य लक्षणे आहेत, ज्याकडे लोक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात, तर काही लोक पेन किल्लर औषध घेऊन झोपणे किंवा विश्रांती घेणे पसंत करतात.

परंतु ही सामान्य समस्या नसून हा सौम्य हृदयविकाराचा झटका असू शकतो, ज्याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात. हृदयविकाराच्या झटक्याची जी लक्षणे बहुतेकांना माहीत असतात, जसे की छातीत तीव्र वेदना होणे, चक्कर येणे आणि पडणे इ. ही सर्व लक्षणे तीव्र झटका आल्यानंतर येतात.

परंतु हे लक्षात घ्या की, स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांसारखी स्पष्ट नसतात. कारण स्त्रियांना हार्मोनल बदलांमुळे देखील अशा समस्या उद्भवतात. ज्यामुळे महिलांमध्ये सायलेंट हार्ट अटॅक आणि हार्मोनल बदल या लक्षणांबाबत संभ्रम आहे. तथापि, स्त्रियांमध्ये देखील पुरुषांप्रमाणेच हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसतात. त्यामुळे स्त्रिया वेळोवेळी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: heart attack symptoms before one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.