जास्त घाम येणं या गंभीर आजाराचा आहे संकेत, जीवालाही होऊ शकतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 01:14 PM2022-07-02T13:14:44+5:302022-07-02T13:14:51+5:30

Heart attack symptoms : अचानक घाम येणं हार्टसंबंधी गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. जर वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. अचानक घाम येणं कोणत्या आजाराचं लक्षण आहे हे जाणून घेऊ.

Heart attack symptoms : Sudden too much sweating is the warning signs of a heart attack stroke dementia | जास्त घाम येणं या गंभीर आजाराचा आहे संकेत, जीवालाही होऊ शकतो धोका!

जास्त घाम येणं या गंभीर आजाराचा आहे संकेत, जीवालाही होऊ शकतो धोका!

Next

Heart attack symptoms : उन्हाळ्यात किंवा मेहनतीचं काम करणाऱ्यांना घाम येणं सामान्य बाब आहे. काही लोकांना प्रत्येक ऋतूमध्ये घाम येतो तर काही लोकांना जास्त उष्णता वाढल्यावर घाम येतो. काही लोकांना अचानक घाम येतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. एक्सपर्ट सांगतात की,  अचानक घाम येणं हार्टसंबंधी गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. जर वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. अचानक घाम येणं कोणत्या आजाराचं लक्षण आहे हे जाणून घेऊ.

The Mirror च्या रिपोर्टनुसार, हेल्थ एक्सपर्टने इशारा दिला की, सामान्यापेक्षा जास्त आणि अचानक घाम येणंही हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. पण जेव्हा कुणी एक्सरसाइज करत नसेल आणि जास्त उष्ण वातावरण नसेल तेव्हा हा घाम यायला हवा. 

जेव्हा कधी कुणाला हार्ट अटॅक येतो तेव्हा कोरोनरी धमण्या हार्टपर्यंत रक्त योग्यप्रकारे पंप करू शकत नाहीत. पण हार्ट अटॅकवेळी हार्टला अधिक रक्ताची गरज असते आणि मग धमण्यांना हार्टपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. अशात शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी जास्त घाम येऊ लागतो.

हार्ट अटॅक दरम्यान खूप सीरिअस मेडिकल कंडिशन असते. यात व्यक्तीला स्वत:ला सांभाळण्याची संधी मिळत नाही आणि जीवही जातो. कोरोनरी धमण्या हार्टपर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम करतात. एनर्जी आणि ऑक्सिजन द्वारे त्याला जिवंत ठेवते. कोरोनरी धमण्यांमध्ये समस्या झाली तर हृदयाच्या मांसपेशींपर्यंत रक्त पुरेसं पोहोचत नाही आणि यामुळेच हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक आल्याने हृदयाची धडधड थांबते. ज्याला कार्डियाक अरेस्ट म्हणतात.

रात्री घाम येणे

महिलांना जर रात्री घाम येत असेल तर ते हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. मेनोपॉज दरम्यान रात्री घाम येणे, गरमीमुळे घाम येणं कॉमन बाब आहे. पण जर त्याशिवायही जास्त घाम येत असेल तर सावध होण्याची गरज आहे.

ड्रग्स डॉट कॉमनुसार, घाम एथेरोस्क्लेरोसिसशी संबंधितही असू शकतो. जी एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांमध्ये प्लाक नावाचा फॅट जमा झाल्याने आकुंचन पावतात. एथेरोस्क्लेरोसिस हार्ट अटॅक आणि हार्ट फेलचं कारण बनू शकतं.

हार्ट अटॅकची इतर लक्षणे

- छातीत दुखणे

- हात दुखणे

- मान, जबडा आणि पाठीवर दबाव

- श्वास घेण्यास त्रास

- चक्कर येणे

- मळमळ किंवा अपचन

- थकवा

- डिमेंशिया

डिमेंशियाचाही होऊ शकतो धोका

रिसर्चनुसार, ज्या मेडिरल कंडिशनमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो त्यामुळे डिमेंशियाचा धोकाही वाढू शकतो. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिट आणि द यूनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरच्या एक्सपर्ट द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, या रिसर्चमध्ये यूके बायोबॅंकमध्ये सहभागी  60 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे 2 लाखापेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. तज्ज्ञांनी यातून निष्कर्ष काढला की, स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकसारख्या स्थिती असणाऱ्या लोकांमध्ये डिमेंशियाचा धोका 3 पटीने अधिक असतो. 

Web Title: Heart attack symptoms : Sudden too much sweating is the warning signs of a heart attack stroke dementia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.