Heart Attack येण्याच्या १ महिनाआधी तुमचं शरीर देतं हे ६ संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 10:42 AM2018-08-10T10:42:15+5:302018-08-10T10:43:20+5:30
कोणताही त्रास होण्यापूर्वी आधीच तो न होण्याची काळजी घेणे हा सर्वात चांगला उपाय मानला जातो. खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही आजारांची लक्षणे माहीत नसतात.
कोणताही त्रास होण्यापूर्वी आधीच तो न होण्याची काळजी घेणे हा सर्वात चांगला उपाय मानला जातो. खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही आजारांची लक्षणे माहीत नसतात. प्रसिद्ध डॉक्टर केके अग्रवाल यांनी लोकमत न्यूजला हार्ट अटॅक येण्याच्या एक महिन्याआधी किंवा काही दिवसांपूर्वी कोणती लक्षणे दिसतात याची माहीती दिली. चला जाणून घेऊ काय आहेत ही लक्षणे....
१) थकवा
असामान्य थकवा हा हार्ट अटॅक येण्याचं मुख्य लक्षण मानलं जातं. पुरुषांच्या तुलनेत महिलांना अशाप्रकारचं लक्षण होण्याची अधिक शक्यता असते. या लक्षणाकडे सहज कुणीही दुर्लक्ष करतं. कधी कधी सोप्या आणि साध्या कामांमुळेही थकवा जाणवतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.
२) पोटात दुखणे
पोटात दुखणे, मळमळ होणे आणि सतत पोट खराब होणे हे सर्वात सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये समान रुपाने दिसतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वी पोटात दुखू शकतं. कधी कधी पोटात थांबून थांबून दुखतं. शारिरिक तणावामुळेही पोटात दुखतं.
३) झोप न येणे
झोप न येणे ही समस्याही हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकच्या वाढत्या समस्येशी संबंधित आहे. ही समस्या महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. झोप न येण्यामागे चिंता आणि तणाव हे मोठं कारण असू शकतं. याच्या लक्षणांमध्ये झोप येण्याची अडचण येणे, झोप आली तर ती फार जास्त वेळ न लागणे अशा गोष्टी येतात.
४) श्वास घेण्यास त्रास
श्वास कमी घेतला जाणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे हार्ट अटॅकचं मोठं लक्षण मानलं जातं. हार्ट अटॅक येण्यापूर्वी ६ महिने पुरुष आणि महिलांना हे लक्षण दिसतं. अशात चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या होतात.
५) केसगळती
केसगळती हृदय रोगासाठी मोठा धोका मानला जातो. बहुदा ही समस्या ५० वयापेक्षा जास्त असलेल्या पुरुषांमध्ये दिसते. काही महिलांनाही ही समस्या होऊ शकते.
६) झातीत दुखणे
पुरुष आणि महिलांना वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगळ्या प्रकारे छातीत वेदना होतात. पुरुषांनी या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.