छातीत जळजळ होत असेल तर वापरा या टिप्स, मिळेल त्वरित आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:00 PM2022-07-31T17:00:24+5:302022-07-31T17:05:01+5:30

छातीत होणाऱ्या जळजळीवर येथे सांगितलेले घरगुती उपाय अवश्य करून पहा.

heart burn remedies and tips | छातीत जळजळ होत असेल तर वापरा या टिप्स, मिळेल त्वरित आराम

छातीत जळजळ होत असेल तर वापरा या टिप्स, मिळेल त्वरित आराम

googlenewsNext

बहुतेक लोकांना हार्ट बर्न म्हणजेच छातीत जळजळ याचा त्रास होतो. छातीत जळजळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. चुकीच्या वेळी खाणे, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, जास्त तेलकट-मसालेदार पदार्थ खाणे. सहसा ही समस्या लोकांमध्ये मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतरच उद्भवते. यासाठी काही लोक स्वतःहून अनेक प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. मात्र तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांनीही त्यावर मात करू शकता. छातीत होणाऱ्या जळजळीवर येथे सांगितलेले घरगुती उपाय अवश्य करून पहा.

छातीत जळजळ दूर करण्यासाठी घरगुती उपाय
- StylesAtlife.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जेव्हाही तुम्हाला हार्ट बर्नचा त्रास होतो. तेव्हा तुम्ही च्युइंगम चघळायला हवे. यामुळे छातीतील जळजळ कमी होऊ शकते. बाजारात अनेक प्रकारचे च्युइंगम उपलब्ध आहेत. तुम्ही कोणतेही च्युईंगम खाऊ शकता. फक्त ते शुगर फ्री असावे, जेणेकरून तुमच्या दातांसोबतच शरीरही निरोगी राहील.

- हार्ट बर्नपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडादेखील वापरू शकता. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्याचे सेवन करा. हे तुम्हाला 10-15 मिनिटांत परिणाम देण्यास सुरुवात करेल.

- कॅमोमाइल चहा प्यायल्यानेही छातीत होणारी जळजळ दूर होते. यासोबतच हा चहा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. छातीत होणारी जळजळ थांबावण्यासाठी एक कप कॅमोमाइल चहा पिणे हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. हा चहा तुम्ही जेवणानंतर पिऊ शकता. तुम्ही घरीही अगदी सहज बनवू शकता.

- सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. ते शरीरात लोहाची कमतरता होऊ देत नाही. तसेच पोटातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. अॅसिडमुळे छातीत जळजळ होण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे सफरचंद खाल्यास जळजळ होण्याची समस्या दूर होईल.

- जर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची समस्या असेल तर मूठभर बदाम खा, तुमची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होईल. एवढेच नाही तर बदाम खाण्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे जेवणानंतर 4-5 बदाम चघळलेच पाहिजेत.

अशा काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही या त्रासावर मात करू शकता. मात्र तरीदेखील तुम्हाला वारंवार जळजळ होण्याची समस्या येत असेल तर एकदा डॉक्टरांना नक्की दाखवा, कारण हा हृदयाशी संबंधित आजारदेखील असू शकतो.

Web Title: heart burn remedies and tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.