चाळीशीच्या आतच हृदयरोगाचा विळखा; दहा वर्षांत २५० टक्क्यांनी वाढले प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 08:58 AM2022-04-26T08:58:44+5:302022-04-26T08:59:05+5:30

शहर, उपनगरांत २०२० मध्ये झालेल्या एक लाख १० हजार मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे.

Heart disease in the forties; Increased by 250% in ten years | चाळीशीच्या आतच हृदयरोगाचा विळखा; दहा वर्षांत २५० टक्क्यांनी वाढले प्रमाण

चाळीशीच्या आतच हृदयरोगाचा विळखा; दहा वर्षांत २५० टक्क्यांनी वाढले प्रमाण

googlenewsNext

मुंबई : गेल्या दहा वर्षांपर्यंत निवृत्तीनंतरचा आजार अशी ओळख असलेल्या हृदयविकाराने ग्रासण्याचे वय आता झपाट्याने घटत असून, आता वयाच्या चाळीशीच्या आत असलेल्या व्यक्तींना या आजाराने मोठ्या प्रमाणावर विळखा घालण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. सरत्या दहा वर्षांत तरुण पिढीला हृदयविकाराने ग्रासण्याच्या प्रमाणात तब्बल २५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते. 

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे २०२० मधे वयाच्या चाळीशीच्या आत आलेल्या रुग्णांची संख्या ही ११६ होती. मात्र, हीच संख्या २०२१ मधे १६८ इतकी झाली, तर २०२२ मधे जानेवारी ते एप्रिल या नव्या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच हा आकडा आतापर्यंत ६७ वर गेला आहे. चाळीशीच्या आत, म्हणजे केवळ ३५ ते ४० वयोगटातीलच नव्हे तर वयाच्या तिशीच्या आतील रुग्णांचाही यात समावेश आहे. अलीकडेच २३ वर्षांच्या एका मुलाला आलेला हृदयविकाराचा झटका ही अतिशय चितेंची बाब असल्याचे मत डॉ. सुरासे यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, शहर, उपनगरांत २०२० मध्ये झालेल्या एक लाख १० हजार मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे  यांनी सांगितले की, २०२० मध्ये एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. जवळपास २५० हून अधिक मृत्यू एका दिवसात झाले आहेत. या मृत्यूंचे संशोधनात्मक परीक्षण होणे गरजेचे आहे. या परीक्षणातून या नेमकी कारणे विशद करता येतील.

 काय करायला हवे? 
nएखाद्या व्यक्तीला जर हृदयविकाराचा झटका अथवा तत्सम काही लक्षणे जाणवली तर कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. तातडीने त्याला जवळच्या दवाखान्यात न्यावे.
nहृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिला एक तास हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तातडीने रुग्णाला दवाखान्यात नेले तर त्यावर उपचार होऊन हृदयाची हानी कमी होण्यास मदत होते. यामुळे या पहिल्या तासाला वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर’ असे म्हणतात.

हृदयविकाराने दाखल होणाऱ्या रुग्णांमधे मधुमेह आणि धूम्रपानाची सवय असल्याचेही प्रामुख्याने दिसून येत असून, या रुग्णांच्या हृदयातील रक्त वाहिन्या अरुंद होतात.

नोकरी जाण्याचे भीती, मानसिक तणाव, अपुरी झोप, बदललेल्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा आळस या घटकांमुळे प्रामुख्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. - डॉ. विजय सुरासे, हृदयरोगतज्ज्ञ

Web Title: Heart disease in the forties; Increased by 250% in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.